मुंबई,4 जून- अवघ्या काही दिवसांपूर्वी ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Ahe) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळेच मालिका टीआरपी रेसमध्ये टॉप 10 च्या यादीत समाविष्ट झाली आहे. दरम्यान मालिकेतून मुख्य अभिनेत्री असणाऱ्या उर्मिला कोठारेने (Urmila Kothare) ही मालिका सोडल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांवर आता पूर्णविराम देत उर्मिलाने सत्य समोर आणलं आहे. पाहूया अभिनेत्री नेमकं काय म्हणाली. उर्मिलाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये खुलासा करत तिने लिहिलंय, ‘‘नमस्कार मी उर्मिला कोठारे, स्टार प्रवाह वरच्या मालिकेत मी वैदेहीची भूमिका करत आहे. सध्या मालिकेत माझा मृत्यू दाखविण्यात आला आहे. त्यामुळे खूप अफवा पसरत आहेत की,, मी मालिका सोडली आहे. परंतु मला तुम्हाला सांगायला आवडेल की ओरिजिनल स्टोरीमध्ये लेखकाने एक महिन्यानंतर वैदेही चा मृत्यू लिहिला आहे. त्यामुळे स्टोरी तशीच सुरु आहे’. ‘मी अजिबात मालिका सोडलेली नाहीय. त्यामुळे मी विनंती करते, ज्या लोकांना हा प्रश्न पडला आहे. किंवा ज्या लोकांनी अशा अफवा पसरविल्या आहेत. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की असं कृपया करू नका. मी या मालिकेत अजूनही आहे. आणि मी स्वराच्या आठवणीत कायम मालिकेत दिसत राहणार आहे. त्यामुळे मी ही मालिका सोडलेली नाही. (हे वाचा:
IIFA: विदेशी धरतीवर अवतरली मराठमोळी अप्सरा, अमृता खानविलकर देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
**)** अभिनेत्री उर्मिला कोठारे मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराची आईचं वैदेहीचं पात्र साकारत आहे. मालिकेतील वैदेही या पात्राचा लवकरच मृत्यू होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार, अभिनेत्री उर्मिला आता मालिकेतून एक्झिट घेणार अशी चर्चा रंगली होती. मालिकेत वैदेहीला कँन्सर झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. तिच्या उपचारांसाठी कोणीही पैसे द्यायला तयार नाही. वैदेहीची मुलगी म्हणजे स्वरा आपल्या आईच्या उपचारांसाठी पैशांची मदत मागताना दिसत आहे. मात्र तिच्या प्रयत्नांना अपयश येणार असून वैदेहीचा मृत्यू होणार आहे. परंतु वैदेहीच्या मृत्यूनंतरही ती स्वराच्या आठवणीत कायम तिला दिसत राहणार. त्यामुळे उर्मिलाने ही मालिका सोडलेली नाहीय.