JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Har Har Mahadev : छोटा पडदा गाजवल्यानंतर 'हा' प्रसिद्ध अभिनेता आता साकारणार ऐतिहासिक भूमिका

Har Har Mahadev : छोटा पडदा गाजवल्यानंतर 'हा' प्रसिद्ध अभिनेता आता साकारणार ऐतिहासिक भूमिका

‘हर हर महादेव’ या चित्रपटात नुकतीच महाराणी सईबाई यांच्या भूमिकेसाठी सायली संजीव हिची वर्णी लागली आहे आणि आता या चित्रपटात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता महत्वाची भूमिका साकारणार आहे.

जाहिरात

हर हर महादेव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  09 ऑक्टोबर :  ‘हर हर महादेव’ हा सिनेमा  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर सिनेमातील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांची नावं आणि लुक समोर येत आहेत. अनेक मराठमोळ्या अभिनेत्री आणि अभिनेते पहिल्यांदा यानिमित्तानं ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे यांची वीर गाथा सांगणार दाखवणाऱ्या हर हर महादेव या सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता सुबोध भावे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्री सायली संजीव यांचे लुक समोर आल्यानंतर आता अजून एका अभिनेत्याचा लुक  समोर आला आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत शरद केळकर, तर बाजीप्रभू यांच्या पत्नीच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे. शिवाय नुकतीच महाराणी सईबाई यांच्या भूमिकेसाठी सायली संजीव हिची वर्णी लागली आहे आणि आता या चित्रपटात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा अभिनेता म्हणजेच हार्दिक जोशी. हेही वाचा - Sushmita sen: ‘माझा रोल तू करणार म्हणजे…’; सुष्मिता सेनविषयी गौरी सावंत यांनी व्यक्त केल्या भावना हार्दिक जोशी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे. त्याने या मालिकेत राणा ही पैलवानाची भूमिका साकारली होती. आता तो  ‘हर हर महादेव’ या चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात हार्दिक आबाजी विश्वनाथ ही  भूमिका साकारणार आहे. त्याच्या या चित्रपटातील लुक आता समोर आला आहे.

संबंधित बातम्या

हार्दिक जोशीने या चित्रपटातील त्याच्या लुकचे पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत लिहिले आहे कि, ‘‘स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ देणारे चतुर, धाडसी, निष्ठावान साथीदार म्हणजे आबाजी विश्वनाथ. त्यांची भूमिका साकारत आहेत अभिनेते हार्दिक जोशी. स्वराज्याचा शिवमंत्र येत्या दिवाळीत संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार.’’

छोट्या पडदा गाजवल्यानंतर आता हार्दिक आता प्रथमच मोठ्या पडद्यावर  ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. ही  भूमिका त्याच्या व्यक्तिरेखेला अगदी शोभून दिसत आहे. या आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक भूमिकेत हार्दिकला बघायला त्याचा चाहतावर्ग चांगलाच उत्सुक आहे. त्याला या नव्या सिनेमासाठी सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत. हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशात प्रदर्शित होणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून हा सिनेमाच एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या