Tujhyat jeev rangala
मुंबई, 11 ऑगस्ट : आज रक्षाबंधनाचा दिवस. आज बहीण भाऊ एकत्र मिळून हा सण साजरा करतात. आज मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सुद्धा आपापल्या बहीण भावांसोबत राखी पौर्णिमा साजरी करत आहेत. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आज बहीण भावांचे खास फोटो शेअर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांना भाऊ बहीण मानतात आणि रक्षाबंधन साजरे करतात. कोणत्या तरी मालिका किंवा चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलेले हे कलाकार त्यानंतर सुद्धा एकत्र पाहून त्यांचे चाहते खुश होतात. आजच्या दिवशी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकारांनी देखील अनेक दिवसांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरे केले आहे. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील राणा-अंजलीची जोडी तर लोकप्रिय झालीच पण त्यांच्यासोबतच मालिकेतील इतर कलाकार देखील लोकप्रिय झाले. त्यातील एक कलाकार म्हणजे मालिकेतील राणादाचा मित्र अर्थात बरकत. मालिकेतला हा बरकत म्हणजे अभिनेता अमोल नाईक. या कलाकाराच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. आज रक्षाबंनधनाच्या दिवशी अमोलने सोशल मीडियावर आपल्या बहिणीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याची बहीण त्याला प्रेमाने ओवाळत राखी बांधते आहे. हेही वाचा - Rakshabandhan 2022 : उर्मिलाने हटके कॅप्शन देत दिल्या रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा; पाहा फोटो अमोलची ही बहीण दुसरी कोणी नसून अभिनेत्री अक्षया देवधर आहे. अक्षया आणि अमोलने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत हे दोघे बरकत आणि अंजली या भूमिका साकारत होते. मालिकेत त्यांचं यांचं नातं हे दीर आणि वहिनी असं असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र हे दोघे एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. दर रक्षाबंधनला अभिनेत्री अक्षया देवधर अमोलला राखी बांधते. यंदाच्या रक्षाबंधनला देखील अक्षयाने अमोलला राखी बांधत उत्साहात राखी पौर्णिमा साजरी केली आहे.
अक्षया आणि अमोलच्या रक्षाबंधनाचा खास व्हिडिओ अमोलने सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘ओ मेरी प्यारी बहना’ हे गाणं वाजत असून या व्हिडीओखली अक्षयाने ‘भावा’ अशी कमेंट केली आहे. दरम्यान या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इतक्या वर्षानंतर मालिकेतील आवडत्या कलाकारांना एकत्र पाहून चाहते खूपच खुश आहेत. अमोलने तुझ्यात जीव रंगला तील सहकलाकार अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुडयाला देखील हजेरी लावली होती. त्याने ‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण’ म्हणत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या.