JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तू तेव्हा तशी' मालिकेतील अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी, बहीण देखील लोकप्रिय अभिनेत्री

'तू तेव्हा तशी' मालिकेतील अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी, बहीण देखील लोकप्रिय अभिनेत्री

झी मराठीवर 20 मार्चपासून तू तेव्हा तशी ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळस्कर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च- झी मराठीवर 20 मार्चपासून तू तेव्हा तशी ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळस्कर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले आणि सुहास जोशी तसेच मीरा वेलणकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिज्ञा भावे मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय मालिकेत आणखी एक अभिनेत्री तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्षवेधून घेताना दिसली. ती म्हणजे मीरा वेलणकर ( meera welankar  ) होय. मीरा वेलणकरचे नातं मनोरंजन विश्वाशी खूप जुन आहे. मीरा वेलणकरचे वडील तर प्रसिद्ध अभिनेते आहेत. शिवाय बहीण देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मीरा वेलणकर  ( madhura welankar ) तू तेव्हा तशी या मालिकेत चित्रलेखाचे पात्र साकारताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर ( pradeep welankar) यांची मीरा मुलगी आहे. प्रदीप वेलणकर यांची नुकतीच झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत एंट्री झाली आहे. यशच्या आजोबांच्या भूमिकेत ते दिसत आहेत. वाचा- अरुंधतीनं धक्के मारत काढलं अनिरुद्धला घराबाहेर, पोलिसात देणार का? मीरा वेलणकरची बहीण मधुरा वेलणकर सोनी मराठीवरील तुमची मुलगी काय करते या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मीरा आणि मधुराने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कला क्षेत्रात दाखल झाल्या. मधुरा वेलणकरने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली तर मीराने अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. मीरा वेलणकरने विजय सावंत यांच्या सोबत लग्नगाठ बांधली. बऱ्याच वर्षानंतर मीरा मालिकेतून अभिनय क्षेत्रात उतरत आहे.

संबंधित बातम्या

मीरा साकारत असलेली चित्रलेखाची भूमिका ही अनामिकाच्या भूमिकेसारखी दिलखुलास आहे. महिलांची बाजू घेणारी आणि त्यांना मदत करणारी चित्रलेखा मीरा निभावताना दिसत आहे. मीरा वेलणकर ही चित्रपट दिग्दर्शिका आहे. झी मराठीवरील बंधन या मालिकेतून मिराने महत्वाचे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर मीरा दिग्दर्शन क्षेत्राकडे वळली. आता पुन्हा एकदा ती अभिनय क्षेत्राकडे वळली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या