JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोज्वळ अश्विनीचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला मॉडर्न अवतार!

सोज्वळ अश्विनीचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला मॉडर्न अवतार!

झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. विशेषकरून या मालिकेत अश्विनीची भूमिका साकारत असतलेल्या अभिनेत्री दीपा परबच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 फेब्रुवारी- झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. विशेषकरून या मालिकेत अश्विनीची भूमिका साकारत असतलेल्या अभिनेत्री दीपा परबच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. साध्या सरळ अश्विनीत प्रत्येत गृहिणीला आपली छबी दिसते. म्हणून कमी काळात मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे. मालिकेत नेहमी सोज्वळ दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अंदाज नुकताच समोर आला आहे. अश्विनीचा ग्लॅमस अंदाज चाहत्यांना देखील भलताच आवडलेला दिसत आहे. एका पोर्टलनं अश्विनीचा ग्लॅमरस अंदाजातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनी काळ्या रंगाच्या पार्टीवेअर वनपिसमध्ये दिसत आहे. अश्विनीचा ग्लॅम अवतार पाहून चाहते देखील घायाळ झाले आहे. अनेकांनी तिला या अवतारात पाहून तिच्या सुंदरतेचे कौतुक केलं आहे. वाचा- इस्राईलच्या रस्त्याला मिळणार शिवाजी महाराजांचं नाव, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत दीपा परब अश्विनीची भूमिक साकारताना दिसते. मालिकेत अश्विनी साधी सरळ अशी गृहिणी साकाराताना दिसते. तिचा साधपणा हाच तिच्या भूमिकेचा आत्मा आहे. हीच साधी अश्विनी महिला वर्गात लोकप्रिय आहे. तिचा असा ग्लॅमरस अवतार चाहत्यांसाठ देखील आश्चर्याचा धक्काच आहे.  अश्विनीनं हा लुक नेमका कशासाठी केला आहे अद्याप समोर आलेले नाही.

संबंधित बातम्या

दीपा परब ही अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे. मध्यंतरी दीपाचा नो मेकअप लूक समोर आला होता. शिवाय एका मुलाखतीत सांगितले होते तिला देखील अश्विनीप्रमाणे साधं साहण्यास आवडतं. अश्विनीच्यात आणि तिच्यात अनेक गोष्टींचे साम्य असल्याचे देखील तिनं म्हटलं होतं.

या मालिकेच्या निमित्ताने दीपाने मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. तिच्य भूमिकेचे तर कौतुक होत आहेच पण तिच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या