JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'वैदेही' आणि 'दीपू'ला हृताचा कोल्ड्रिंक धक्का; Timepass3 चं हे गाणं पाहून तुम्हीही पडाल चाट

'वैदेही' आणि 'दीपू'ला हृताचा कोल्ड्रिंक धक्का; Timepass3 चं हे गाणं पाहून तुम्हीही पडाल चाट

टाइमपास 3 बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘टाईमपास 3’ (Timepass 3). हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा जोरदार कल्ला पहायला मिळतोय. चित्रपटातील अनेक गाणी प्रदर्शित होत असून गाण्यांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याविषयी अभिनेत्री हृता दुर्गुळेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ‘टाईमपास 3’ चित्रपटातील नवं गाणं ‘कोल्ड्रिंक’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दगडू आणि पालवीची जुळलीय प्रेमाची लिंक, म्हणूनच आणलंय गाणं ‘कोल्ड्रिंक’!, अशा कॅप्शनसह हृतानं गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित झाल्याचं सांगितलं आहे. मागच्या गाण्यांप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. हृतानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. हेही वाचा -  अंकुश चौधरी सांगणार ऑटोग्राफवाली लव्हस्टोरी, पुन्हा एकदा दिसणार ‘या’ दिग्दर्शकासोबत टाईमपास 3 मधील इतर गाण्यांप्रमाणेच या गाण्यातही प्रथमेश आणि हृताची म्हणजेच दगडू आणि पालवीची जबरदस्त केमेस्ट्री पहायला मिळत आहे. अगदी काही कालावधीत हे गाणं व्हायरल होत असलेलं पहायला मिळतंय. या व्हिडीओला कमी वेळात मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज आलेले पहायला मिळत आहे. हृताचा हा अंदाज पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. वैदैही, दिपू साकारणाऱ्या हृतानं या गाण्यातून सगळ्यांनाच धक्का दिला आहे आणि एक वेगळा अंदाज दाखवला आहे. अमितराज आणि हिंदीमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या शाल्मली खोलगडे यांनी  संगीत दिलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे भन्नाट शब्द आणि चाल आणि त्याला न्याय देणारं तेवढंच धम्माल नृत्य दिग्दर्शन. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी रचलेल्या कोरिओग्राफीवर प्रथमेश आणि हृता यांनी भन्नाट डान्स केला आहे.

संबंधित बातम्या

सध्या पावसामुळे सगळीकडे गार गार वातावरण झालंच आहे. हा गारवा अधिक वाढवण्याचं काम हे ‘कोल्ड्रिंक’ गाणं करणार आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास 3 चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. येत्या 29 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या