Prathamesh Parab
मुंबई, 08 जुलै: टाईमपास (Timepass) मधला दगडू म्हणून जनसामान्यांच्या मनात जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे (Prathamesh Parab) प्रथमेश परब. “हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ हा प्रथमेशचा म्हणजेच दगडूचा डायलॉग अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला. आता या टाईमपास सिरीजमधलाच टाईमपास 3 (Timepass 3) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्येही प्रथमेश प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या प्रथमेश बिझी दिसतोय. यावेळी प्रथमेश चक्क रस्त्यावर नाचताना दिसतोय. टाईमपास 3 चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी प्रथमेश चक्क भर रस्त्यात नाचत आहे. या सिनेमातलं ‘साई तुझं लेकरू’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे ज्याला तुफान प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. फिल्मचं प्रमोशन करायला काय पण! असा पवित्रा घेत प्रथमेश सध्या जोशात या नव्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्याच्या चित्रपटातील ’ या गाण्यावर ताल धरत त्या गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. प्रथमेश परब प्रचंड एनर्जीत डान्स करताना दिसतोय. (Prathamesh Parab Instagram) प्रथमेश सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह असतो. सध्या साई तुझं लेकरू या गाण्याची सोशल मिडियावरही प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. प्रथमेश देखील वेगवेगळ्या लोकांसोबत या गाण्यावर डान्स करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. हे ही वाचा- Kranti Redkar: ‘तू ये आमच्याकडे तुला ट्रॅफिक काय असतं दाखवते’; क्रांतीचा धमाल video पाहा टाईमपास या सिनेमाची ही सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात प्रथमेश करत असलेलं दगडू हे पात्र त्याच्यासाठी बरंच स्पेशल आहे कारण त्याला खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून घराघरात ओळख याच पात्राने दिली आहे. त्याचं हे रावडी अंदाजातलं पात्र या तिसऱ्या भागात नेमकी काय धमाल करणार हे बघणं मजेदार ठरेल. टाईमपास नंतर प्रथमेशने दृश्यम, टकाटक, उर्फी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या.
या सिनेमात प्रथमेशसोबत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात तिचा अंदाज सुद्धा एकदम भन्नाट असल्याचं टिझर मध्ये पाहायला मिळालं आहे. आता दगडू आणि पालवी यांचं भन्नाट कथानक कसं असेल हे चित्रपट रिलीज झाल्यावर खऱ्या अर्थाने समजेल. येत्या काळात प्रथमेश टकटक 2, द्रिश्यम 2 या सिनेमांमध्ये दिसून येणार आहे. सध्या तरी त्याने अजमवलेल्या या हटके प्रमोशन स्ट्रॅटेजीमुळे तो लोकप्रिय होताना दिसत आहे.