मुंबई, 11 जुलै : महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta durgule) सध्या चौफेर बॅटिंग करताना दिसत आहे. हृताचे आगामी (Hruta durgule upcoming movie)दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तोच दुसरीकडे तिची मालिका ‘मन उडू उडू झालं’ प्रेक्षकांच्या (Man udu udu zal serial) मनात घर करत आहे. त्यामुळे हृता सध्या कामात खूप व्यस्त असलेली पहायला मिळत आहे. अशातच हृता आणखी एका कारणामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. हृता दुर्गुळेचा ‘टाईमपास 3’ हा चित्रपट (Timepass 3 movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमातील ‘साई तुझं लेकरू’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसादही मिळालेला पहायला मिळाला. अशातच या सिनेमातील आणखी एका गाण्याचा टीझर प्रदर्शीत झाला आहे. ‘लव्हेबल’ (lovable marathi song)असं गाण्याचं नाव असून हे गाणं आज प्रदर्शित होणार आहे. हृतानं तिच्या इन्स्टाग्रामवर (hruta durgule instagram) या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. गाणं प्रदर्शित होण्याआधीच टीझरवर आणि हृताच्या लुकवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस केला आहे. हेही वाचा - Manushi Chhillar VIDEO: ‘काही खाते की नाही ही!’ मिस वर्ल्डची अशी अवस्था पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल हृतानं शेअर केलेल्या या लव्हेबर टीझरमध्ये (Lovable song teaser) ती कोळी वेशभूषेत दिसत आहे. तिच्या या लुकनं गाण्याची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. या टीझरमध्ये प्रथमेशही दिसत असून त्याचा सूटबुटमधील लुक पाहून एक वेगळचा ट्विस्ट पहायला मिळतोय. टाईमपास 3 मधील हे नवं गाणं आज प्रदर्शित होणार असून टीझरनं उत्कंठा आणखीनच वाढवली आहे.
टाईमपास 3 मध्ये अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री हृताच्या अभिनयाची चाहत्यांना किती भुरळ पडते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. टाईमपासचा लोकप्रिय दगडू आणि दगडूच्या आयुष्यात आलेली ‘पालवी’ पाहायला मिळणार आहे. या पालवीची भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. रवी जाधव दिग्दर्शित असलेला हा सिनेमा 29 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हृता तिच्या दोन्ही आगामी चित्रपटांत धाटणीच्या भूमिका साकरताना दिसणार आहे. अनन्या ही एका अपघातात वाचलेल्या मुलीची प्रेरणा देणारी गोष्ट आहे तर टाईमपास सिनेमात ती पालवी पाटील नावाच्या रावडी भूमिकेत दिसणार आहे. हृतानं आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम केलं आहे. नव्या भूमिकेतूही ती सगळ्यांच्या अपेक्षेवर खरी उतरणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.