JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonali Phogat : 'तिच्या जेवणात काही तरी...'; सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर बहिणीचा खळबळजनक आरोप

Sonali Phogat : 'तिच्या जेवणात काही तरी...'; सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर बहिणीचा खळबळजनक आरोप

बिग बॉस फेम आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बहिणीनंतर एक खळबळजनक आरोप केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  23 ऑगस्ट: बिग बॉस फेम अभिनेत्री, टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं आज गोव्यात निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली यांच्या निधनानं त्यांच्या लाखो चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं.  सोनाली फोगट यांच्या निधनानंतर अनेकांनी शंका देखील व्यक्त केल्या आहेत. दरम्यान सोनाली यांच्या बहिणीनं त्यांच्या मृत्यूनंतर खळबळजनक आरोप केला आहे. सोनाली यांच्या जेवणात काही तरी गडबड होती असा आरोप त्यांच्या बहिणीनं केला आहे. बहिणीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून सोनाली यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सोनाली फोगट यांच्या बहिणीनं आरोप करत म्हटलं आहे की,  ‘सोनाली यांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी तिचं आईबरोबर बोलणं झालं होतं. फोनवर बोलताना सोनाली थोडी अस्वस्थ परिस्थितीमध्ये होती.   माझ्या जेवणात काही तरी गडबड आहे अशी, शंका तिनं आईकडे बोलून दाखवली होती. इतकंच नाही तर माझ्या शरिरात काही गडबड आहे. असं वाटत आहे की कोणीतरी माझ्यावर काही तरी केलं आहे.असंही तिनं आईला सांगितलं होतं. सोनालीच्या या शंकेनंतर काही तासातच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि सोनाली यांचा मृत्यू झाला’, असा आरोप सोनालीच्या बहिणीनं केला आहे. सोनाली यांच्या बहिणीनं जरी हा गंभीर आरोप केला असला तरी सोनालीच्या यांच्या पोस्टमर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं खरं कारण सर्वांसमोर येणार आहे. हेही वाचा - पतीचा संशयास्पद मृत्यू, भाजप प्रवेश अन् आता सोनाली फोगट यांनीही घेतला जगाचा निरोप, ‘त्या’ 6 वर्षात काय घडलं? आम आदमी पार्टीचे हरियाणाचे नेते नवीन जयहिंद यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना सोनाली यांच्या मृत्यूची cbi किंवा हायकोर्टाच्या सिटींग जजकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

सोनाली यांचे पती संजय फोगट हे भाजप नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनाली यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली होती.  त्याचप्रमाणे सोनालीनं टेलिव्हिजनवरही अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं होतं. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होत्या. तिथे त्यांची मोठी फॅन फॉलोविंग होती.  इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स व्हिडीओ त्या करत होत्या.  त्यांच्या निधनानंतर त्यांच्या फॅन्सनाही मोठा धक्का बसला आहे. सोनालीआधी 2016मध्ये सोनाली यांचा पती संजय फोगट यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. हरियामामधील एका फार्म हाऊसमध्ये त्यांचा संशयास्पद मृतदेह आढळला होता.  सोनाली या बिग बॉस 15मध्ये सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या