JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tiger Shroff : दिशानंतर टायगर श्रॉफ 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Tiger Shroff : दिशानंतर टायगर श्रॉफ 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर टायगर आता दुसऱ्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता टायगरने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

जाहिरात

Tiger Shroff

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूड मध्ये सतत काही ना काही घडामोडी घडत असतात. कलाकारांच्या ब्रेकअपच्या तर बातम्यांना कायम ओघ असतो. मध्यंतरी बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून सोबत असलेले कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे  ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली होती. पण  या दोन्ही कलाकारांनी या बातमीवर  मौन पाळले होते. त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण अलीकडे टायगर  श्रॉफ दिशा पाटनीशी  ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा होत आहेत. आता तो  दुसऱ्या एका अभिनेत्रीला  डेट करत असल्याचे बोलले जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे  आकांक्षा शर्मा. तिने यापूर्वी टायगर सोबत ‘कॅसानोव्हा’ आणि ‘आय एम अ डिस्को डान्सर २.०’ या दोन म्युझिक व्हिडिओंसाठी एकत्र काम केले आहे. पण आता या सगळ्या चर्चाना टायगरनेच पूर्णविराम दिला आहे. ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत टायगर शॉर्फने  या बातम्यांवर त्याचे मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. त्याने त्याच्या आणि आकांक्षा  शर्माच्या डेटिंगच्या बातम्या खऱ्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण टायगरने त्याच्या आणि दिशांच्या ब्रेकअप वर मात्र मौन पाळणेच  पसंत केले. हेही वाचा - Rakshabandhan 2022 : ‘तुझ्यात जीव रंगला’ तील ‘या’ बहीण भावाने एकत्र येत साजरे केले रक्षाबंधन; पाहा व्हिडीओ टायगर आणि दिशा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट  करत आहेत. टायगर त्याच्या आई-वडिलांपासून, जॅकी आणि आयशापासून वेगळे राहायला लागल्यापासून दिशा आणि टायगर जवळजवळ एकत्र राहत होते असे म्हटले जाते. दिशाने टायगर जवळ लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याने लग्नाला नकार दिल्याने दोघांचे ब्रेकअप झाले अशा चर्चा आहेत.

संबंधित बातम्या

दरम्यान , टायगर श्रॉफने अलीकडेच दिशाला तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते  आणि कलाकारांचे अभिनंदन केले होते. दिशाने  या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली होती. टायगरने तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते. त्यामुळे या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याशिवाय, जेव्हा जॅकी श्रॉफला टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपच्या अफवांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, “टायगर आणि दिशा नेहमीच मित्र होते आणि अजूनही मित्र आहेत. मी त्यांना अनेकदा एकत्र  पाहिले आहे. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात.” अशी प्रतिक्रिया दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या