नवी दिल्ली, 15 मार्च : शुक्रवारी, 11 मार्च रोजी देशभरात ‘दी कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा रिलीज झाला. काश्मिरी पंडितांना (Kashmir Pandits) काश्मीर खोऱ्यातून आपली मायभूमी, घरं सोडून निर्वासित व्हावं लागलं, त्यावर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच त्याबद्दल डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींमध्ये बरेच वादविवाद सुरू होते. सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला. हा सिनेमा देशभरातल्या थिएटर्समध्ये चांगली कमाई करतो आहे. ज्या वेगाने या सिनेमाची कमाई वाढत आहे, त्याच वेगाने सिनेमावरून होणारं राजकारण आणि थिएटर्समधले वादही वाढत चालले आहेत. त्या अर्थाने, या सिनेमाच्या बाबतीत एकाच वेळी वेगवेगळ्या भावना उचंबळून आल्या आहेत. एका बाजूला, काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पळ काढावा लागला त्याबद्दल जनतेत राग आहे. दुसऱ्या बाजूला, घटनेची दुसरी बाजू मांडली जात आहे. या घटनांच्या मालिकेत केरळ काँग्रेसने (Kerala Congress) आज एकापाठोपाठ एक नऊ ट्विट्स करून सत्य गोष्टी मांडल्याचा दावा केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, काँग्रेसला (Congress) इतिहास माहिती नाही, असं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी टाकला आणखी एक खळबळजनक पेनड्राइव्ह बॉम्ब; कुणाचे आहेत दाऊदशी संबंध? थिएटर्समध्ये नागरिकांना सिनेमा पाहिल्यानंतर अतीव दुःख होत आहे. अनेक ठिकाणी काही अप्रिय घटनाही घडल्या आहेत. अनेक ठिकाणी विरोधामुळे एक तर या सिनेमाचं स्क्रीनिंग थांबवण्यात आलं आहे किंवा सिनेमा म्यूट करून दाखवण्यात आला आहे. जम्मू, शिलाँग आणि आणखी काही ठिकाणी वाद झाल्याचं वृत्त आहे. सोशल मीडियावरही नागरिक याबाबत मतप्रदर्शन करत आहेत. दक्षिण गोव्यात 13 मार्चला काही नागरिकांनी आयनॉक्स (Inox Theaters) थिएटरच्या मॅनेजरने तिकिट्स न दिल्याच्या कारणावरून गोंधळ घातला. तिकिटांची ऑनलाइन विक्री झालेली होती; मात्र नागरिक थिएटरमध्ये घुसले तेव्हा बहुतांश सीट्स रिकाम्याच होत्या, असा त्यांचा दावा आहे. आयनॉक्सच्या व्यवस्थापनाने हा कट रचला होता, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पणजीमध्ये स्वतः ‘दी कश्मीर फाइल्स’ पाहणार आहेत. भारताचं मिसाईल हद्दीत येत असल्याचं माहीत असूनही पाकिस्तानने कारवाई का केली नाही? काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराच्या सत्यतेबद्दलच्या वादाने आता राजकीय वळण घेतलं आहे. केरळ काँग्रेसने काश्मिरी पंडितांची हत्या आणि पलायनाची तुलना मुस्लिम समुदायाच्या हत्येशी केली आहे. त्या संदर्भात केरळ काँग्रेसने 9 ट्विट्स केली आहेत. दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना लक्ष्य केल्याचं त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 1990 ते 2007 या कालावधीत 399 काश्मिरी पंडित दहशतवादी हल्ल्यात मारले गेले; मात्र याच कालावधीत दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या मुस्लिमांची संख्या 15 हजार होती, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं; मात्र त्यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं.
दुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे, ‘1984 सालानंतरच्या सांप्रदायिक दंगलींमध्ये जम्मूमध्ये एक लाखाहून अधिक काश्मिरी मुसलमान मारले गेले. तरीही त्याचा सूड घेण्यासाठी काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या नाहीत. जम्मू-काश्मीरचं राज्यपालपद जगमोहन यांच्याकडे होतं, तेव्हा काश्मिरातून मोठ्या प्रमाणावर पंडितांचं पलायन झालं. राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. भाजपच्या पाठिंब्याचं व्ही. पी. सिंह यांचं सरकार केंद्रात सत्तेत होतं, तेव्हा पंडितांचं पलायन झालं. पंडितांची हत्या झाल्यानंतर त्यांना संरक्षण देण्याऐवजी राज्यपाल जगमोहन यांनी त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. बरेच काश्मिरी पंडित असुरक्षिततेच्या भावनेमुळे खोरं सोडून गेले. पंडित काश्मिरातून पळून गेले, त्याच सुमारास अयोध्येतल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्याचं इंजिनीअरिंग भाजप (BJP) करत होता. पंडितांच्या पलायनाचा मुद्दा भाजपच्या प्रपोगंडाशी मिळताजुळता आहे. डिसेंबर 1989मध्ये भाजपने व्ही. पी. सिंह (V. P. Singh) यांच्या सरकारला पाठिंबा दिल्यानंतर 1990पासून काश्मिरातून पंडितांना बाहेर पडावं लागलं.’ मध्य प्रदेश ठरतंय दहशतवाद्यांचं नवं टार्गेट, ATS च्या कारवाईत 4 दहशतवादी ताब्यात काँग्रेसच्या या ट्विट्सनंतर भाजपच्या शहझाद पूनावाला यांनी पलटवार केला आहे. त्यांनी काँग्रेसचा प्रतिवाद करणारं ट्विट केलं आहे. ‘नाझीवाद आवडणाऱ्या व्यक्ती होलोकास्टच्या घटनेचा इन्कार करतात, तसंच इस्लामवादी काँग्रेसने केलं आहे. काश्मिरात झालेला हिंदू नरसंहार योग्य असल्याची भूमिका काँग्रेस मांडत आहे. त्यामुळे काँग्रेसला आता आयएनसीऐवजी इस्लामो नाझी काँग्रेस असं म्हटलं पाहिजे.’ ‘काँग्रेसला आताही इतिहास समजत नाही. काँग्रेसकडून इतिहासाचं विकृतीकरण सुरू आहे. सांप्रदायिक आधारावर सत्तावाटपाच्या राजकारणामुळे 1.5 लाखांहून अधिक काश्मिरी पंडितांना राज्यातून बाहेर पडावं लागलं, हे सर्वांनाच माहिती आहे. त्या वेळी काँग्रेस किंवा काँग्रेसचा पाठिंबा असलेली सरकारंच होती, हेही सर्वांना माहिती आहे,’ असं ट्विट भाजप खासदार के. जे. अल्फोन्स यांनी केलं आहे.