तेजस्विनी पंडित
मुंबई, 05 मार्च :मराठीतील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ला ओळखलं जातं. तेजस्वीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. केवळ अभिनयचं नाही तर तेजस्विनीने आता निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. नुकतीच तिने निर्मिती केलेली ‘अथांग’ ही वेबसिरीज प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाली होती. ही वेबसिरीज चांगलीच गाजली. याला प्रेक्षकांचा चांगला पाठींबा मिळाला. तसंच यातील अभिनेत्याचं देखील चांगलंच कौतुक झालं. अथांग या सिरीजमध्ये तेजस्विनीनं एका नवोदित अभिनेत्याची निवड केली होती. त्यासाठीच तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोबत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात आलेले अनेक अनुभवही शेअर करत असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील एका खास व्यक्तीचं कौतुक करत एक पोस्ट शेअर केली. तेजस्विनी पंडितचा खास मित्र धैर्य घोलप याने अथांग वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका निभावली आहे. त्याच्या या भूमिकेचं चांगलं कौतुक झालं. याच भूमिकेसाठी नुकतंच त्याला मटा सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याविषयी तेजस्विनीने एक खास पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. Amruta Dhongade: बिग बॉसनंतर आता अमृता धोंगडे करतेय लग्न? हाता - पायावर मेहंदी सजलेली पाहून चर्चांना उधाण या पोस्टमध्ये तेजस्विनीनं म्हटलंय कि, ‘सर्वप्रथम Sorry तुझ्या अत्यंत महत्वाच्या क्षणी मी सोबत नव्हते. कुठे आहे तेही माहीत आहेच तुला, तरी ह्याला appreciation पोस्ट म्हणू का काय माहित नाही पण अभिमानाची पोस्ट नक्कीच आहे. माझ्या लाइफ ची History repeat होतेय असं वाटून गेलं. मी जेंव्हा industryt आले माझी सुरुवात character roles पासून झाली…अनेक roles केले पण lead role देण्यासाठी कुणी विश्वास नाही दाखवला…पण पहिली वेळ कधीतरी यावी लागते, येतेच….’
तेजस्विनीने पुढे तिच्याबद्दल एक अनुभव सांगताना म्हटलं आहे कि, ‘अशोक समर्थ ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला एका सिनेमात lead role दिला. सिनेमा होता वावटळ…त्या सिनेमातल्या रोल ने मला माझ्या आयुष्यातलं पाहिलं BEST ACTRESS चा nomination दिलं, तेही Ma ta Sanmanchच आणि Award ही मिळालं Best Actress चा…पहिलं वाहिलं खासंच असतं नाही…?!आणि आज धैर्य च्या बाबतीत सेम घडताना बघतेय…’
पुढे तेजस्विनीने धैर्यचं कौतुक करत लिहिलंय कि, ‘अथांगसाठी onscreen आणि offscreen दोन्हीसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.मला अजूनही आठवतंय त्याला cast करताना मला आणि संतोषला खूप विरोध पत्करावा लागला….काहीजण म्हणाले अगं नाव असलेला नट घे, काही म्हणाले त्याला lead चा experience नाही (आजपर्यंत उलगडलं नाही, experience घेतल्याशिवाय experience कसा येतो ?! ) काही म्हणाले अगं insta followers असतील अश्याला घे (हल्ली तुमच्या followers वरुन casting होतं मग टॅलेंट असो नसो फरक पडत नाही) पण मी आणि संतोष अडून राहिलो. ह्यात अक्षय ने खंबीरपणे आमची साथ दिली. आमच्यावरच्या विश्वासावर त्याने विश्वास ठेवला आणि finally तेंव्हा धैर्य cast झाला…’’ ‘तू माझ्यासाठी आजतागायत मित्र म्हणून जे काही केलेस ते माझ्यासाठी शब्दात मांडणे कठीण आहे. तुझं खूप खूप अभिनंदन’ असं म्हणत तेजस्विनीने भावना व्यक्त केल्या आहेत.