हैदराबाद, 07 जून- सिनेमा आणि खेळ यांचं एक वेगळं नातं आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचं नाव एकमेकांशी जोडलं गेलं. आता अजून एका जोडीच्या नात्याची चर्चा बी-टाऊनमध्ये होत आहे. ज्वाला गुट्टाच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत आल्या आहेत. जेव्हा या अभिनेत्याने ज्वालासोबतच्या नात्याचा खुलासा केला तेव्हा दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा अभिनेता दुसरा- तिसरा कोणी नसून तमिळ अभिनेता विष्णू विशाल आहे. नऊ वर्षांचं लग्न मोडत विष्णूने महिन्याभरापूर्वी पत्नी रजनी नटराजला घटस्फोट दिला होता. याच बातमीनंतर विष्णून चर्चेत आला होता. रजनी आणि विष्णू यांना आर्यन हा तीन वर्षांचा मुलगा ही आहे. सिनेमात राष्ट्रगीतावेळी हॉलमध्ये उभे राहिल्याबद्दल सलमानने मानले आभार, म्हणाला ‘जय हिंद’
रजनीला घटस्फोट दिल्यानंतर विष्णूने ज्वालाला डेट करायला सुरुवात केली. विष्णूने ट्विटरवर ज्वालासोबतचे अनेक फोटो शेअर केले. यानंतर दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. आता ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विष्णूने ज्वालासोबत तो नात्यात असण्याची कबुली दिली आहे. रिलेशनशिपच्या प्रश्नावर बोलताना विष्णू म्हणाला की, ‘ज्वाला आणि मी एकमेकांना वर्षभरापासून ओळखत आहोत. आमचे अनेक मित्र- मैत्रीणी कॉमन आहेत. यामुळे आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवतो.’ विष्णू पुढे म्हणाला की, ‘हो आम्ही एकमेकांना पसंत करतो आणि एकमेकांसोबत भविष्याचा विचार करत आहोत. पण आत्ताच यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही.’ अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कारावर चिडलं बॉलिवूड, आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी याआधी ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत विष्णूने रजनीसोबत झालेल्या घटस्फोटाबद्दल आपलं मत दिलं की, ‘आमच्या नात्यात सगळंच अनिश्तिच आहे. कधीही काहीही होऊ शकतं. मला अजूनही हे कळत नाहीये की नेमकी असं काय झालं.’ अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करण्याच्या प्रश्नावर विष्णू म्हणाला का, ‘हे सगळं तेव्हा झालं जेव्हा आमचं नातं बिघडत चाललं होतं.’ VIDEO- शाहरुख खानने चक्क गाडीच्या छतावर चढूनच चाहत्यांना दिलं सरप्राइज रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग?