मुंबई, 04 मे- संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या चित्रपटातील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता यानंतर या सिनेमाचा टीझर (Tamasha Live Teaser ) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर सध्या या टीझरचीच चर्चा आहे. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सोनाली कुलकर्णीनं सिनेमाचा टीझर इन्साटाला शेअर केला आहे. तिनं टीझर शेअर करत म्हटलं आहे की, बातमी रंगणार, झुंज लागणार…खेळ सुरू होणार २४ जूनला… सादर आहे ‘तमाशा Live’ सिनेमाची पहिली झलक!सोनालीनं शेअर केलेल्या या टीझरमध्ये सिद्धार्थ म्हणतो आहे की, बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार? हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना 24 जूनला मिळणार आहे. वाचा- ‘आज ३ तारीख,. ’ प्राजक्ता माळीनं राज ठाकरे यांच्याविषयीची ‘ती’ पोस्ट केली एडिट ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सचित आणि सोनालीचा रॉकिंग डान्सही पाहायला मिळत आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.
प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मिती ‘तमाशा लाईव्ह’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाण्यांचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत.