JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tamasha Live: जेव्हा सोनाली दाजींना papsसाठी पोझ करायला शिकवते; पाहा क्युट VIDEO!

Tamasha Live: जेव्हा सोनाली दाजींना papsसाठी पोझ करायला शिकवते; पाहा क्युट VIDEO!

तमाशा लाईव्ह चित्रपटाच्या प्रीमिअरचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांनी या सिनेमाच्या प्रिमिअरला हजेरी लावत आपला हटके अंदाज दाखवला. यातीलच एक क्युट व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : आपल्या सौदर्यानं सगळ्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni). सोनाली सध्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन सिनेमाविषयी अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. तमाशा लाईव्ह चित्रपटाच्या प्रीमिअरचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांनी या सिनेमाच्या प्रिमिअरला हजेरी लावत आपला हटके अंदाज दाखवला. यातीलच एक क्युट व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ सोनाली कुलकर्णी आणि दाजी म्हणजेच सोनालीचा नवरा कुणाल बेनोडकर या दोघांचा आहे. ‘तमाशा लाईव्ह’ सिनेमाच्या प्रिमिअरला अनेक मोठमोठे मराठी कलाकार सहभागी झाले होते. अशातच सोनालीचा नवरा कुणाल बेनोडकरही यावेळी उपस्थित होता. यावेळी या जोडीनं सोबत फोटो काढलेले पहायला मिळाले. पापराझींना फोटो काढण्यासाठी पोझ देतानाचा दोघांचा एक व्हिडीओे समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की सोनाली कुणालला पापाराझींसमोर, त्यांच्या एवढ्या सगळ्या कॅमेऱ्यांसमोर कशी पोझ द्यायची शिकवत आहे. दोघांचा क्युट व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. राजश्री मराठीनं त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हेही वाचा -  टीव्हीवरील प्रसिद्ध नायिका दीपू-अप्पू येणार एकत्र; काय आहे कारण? सोनाली आणि कुणालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. ‘दोघेही सोबत खूप सुंदर दिसता, क्युट जोडी, दोघांना खूप सारं प्रेम’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहे.

संबंधित बातम्या

सोनालीने 7 मे रोजी दुबईमध्ये कुणालशी लग्न केले आणि कडक कोविड-19 लॉकडाऊनमध्ये ती तिच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि कुटुंबियांना आमंत्रित करु शकली नाही. तिचे आई-वडील व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या लग्नाला उपस्थित होते. नातोवाईक आईवडिल उपस्थित राहू न शकल्यानं सोनालीनं पुन्हा एकदा कुणालशी लग्न केलं. लग्नानंतर सोनाली आणि कुणाल हनिमूनसाठी मेक्सिकोला गेले होते. त्याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “खूप मजा आली. मेक्सिको सुंदर आहे! हनिमूनपेक्षाही आमच्यासाठी सुट्टीचा दिवस होता. लग्नसोहळा तणावपूर्ण असतो, त्यामुळे आम्ही तो तणाव दूर करण्यासाठी आणि आराम करायला गेलो.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या