JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताला ट्रेकदरम्यान आला पॅनिक अटॅक, शेअर केला जीवघेणा अनुभव

‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताला ट्रेकदरम्यान आला पॅनिक अटॅक, शेअर केला जीवघेणा अनुभव

टांझानियातील या ट्रेकसाठी मुनमुन अनेक दिवसांपासून तयारी करत होती. मात्र ट्रेकवर असताना तिला पॅनिक अटॅक आला आणि तिला अर्ध्या मार्गावरून परत यावं लागलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील बबिता अर्थात मुनमुन दत्ताला नवनवीन जागी जाणं आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची आवड आहे. तिच्या अनेक इन्स्टाग्राम फोटोमध्ये ती आपले अनुभव शेअर करतच असते. नुकतीच ती पूर्व आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. टांझानियातील या ट्रेकसाठी मुनमुन अनेक दिवसांपासून तयारी करत होती. मात्र ट्रेकवर असताना तिला पॅनिक अटॅक आला आणि तिला अर्ध्या मार्गावरून परत यावं लागलं. मुनमुन माउंट किलिमंजारो येथे ट्रेक करण्यासाठी गेली होती. ट्रेकला जाण्याआधी मुनमुनने दुसऱ्या दिवसाचा अनुभव शेअर करताना म्हटलं की, ‘दुसऱ्या कॅम्पवर पोहोचल्यामुळे मी फार आनंदी आणि उत्साहीत आहे आणि आम्हाला किलिमंजारो शिखर स्पष्ट दिसत आहे. हे जितकं जवळ वाटत आहे तितकंच ते दूर आहे.’

अभिनेत्रीला दोन दिवसानंतर ट्रेकच्या मध्येच पॅनिक अटॅक आला, त्यामुळे तिला तातडीने खाली आणावं लागलं. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘ही ती रात्र होती जेव्हा मला काळोखामुळे क्लस्ट्रोफोबिक आणि पॅनिक अटॅकमुळे शिखरावरून खाली आणण्यात आले.’ यानंतर तिने दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘दुःखत अंतकरणाने मला सांगावं लागत आहे की, मला दिवसात दोन वेळा गंभीर क्लॉस्ट्रोबियामुळे माउंट किलिमंजारो ट्रेक अर्ध्यावर सोडावा लागला. मी आमच्या टीममधली शारीरिक आणि मानसिक पातळीवर सर्वात मजबूत व्यक्ती होती. मला माहीत होतं की वेळेच्या आधीच मी ते शिखर सर केलं असतं. पण प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात असतेच असं नाही. माझ्याबाबतीत क्लॉस्ट्रोफोबियाचा विचार मी ट्रेकच्याआधी केला नव्हता. पण त्या शिखराने मला तो विचार करायला लावला.’

जाहिरात

मुनमुनने पोस्टमध्ये लिहिलं की, तो गर्द काळोख मला घाबरत होता. मी इतकी घाबरली होती की माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी माझ्या कॅम्पच्या बाहेर जवळपास बेशुद्धच पडली होती. याच कारणामुळे मी ट्रेक तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. मी सुर्यास्तानंतर होणाऱ्या अंधाराला प्रत्येक दिवशी घाबरत होते.

जाहिरात

मुनमुनने १२ हजार फुटांचा ट्रेक पूर्ण केला होता. तिने यावेळी टीमचे तिचे प्राण वाचवण्यासाठी आभार मानले. तसेच हा अनुभव तिला खूप काही शिकवूनही गेला हे नमूद करायला ती विसरली नाही. या प्रसंगानंतर ती स्वतःला एक वेगळी व्यक्ती मानते. एक वाईट अनुभव आला असला तरी मुनमुनला तो ट्रेक पुन्हा कधीतरी नक्कीच पूर्ण करायचा आहे. ‘या’ गंभीर आजाराशी लढतेय ही अभिनेत्री, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या