JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Anvita Phaltankar: 'पावसात कुठे फिरायला जायला आवडेल?', स्वीटूने पटकन घेतलं याठिकाणाचं नाव

Anvita Phaltankar: 'पावसात कुठे फिरायला जायला आवडेल?', स्वीटूने पटकन घेतलं याठिकाणाचं नाव

पावसाळा आला की निसर्ग हिरवाईने अगदी नटून जातं. यादरम्यान अनेक सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार भटकंतीचे प्लॅन बनवतात. अनेकजण सोशल मीडियार पावसाळयात आपल्याला कुठे फिरायला जायला आवडेल याबाबत व्यक्त होत असतात. दरम्यान एका चाहत्याने अन्विताला हाच प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला अन्विताने आपल्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै- पावसाळा आला की निसर्ग हिरवाईने अगदी नटून जातं. यादरम्यान अनेक सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार भटकंतीचे प्लॅन बनवतात. अनेकजण सोशल मीडियार पावसाळयात आपल्याला कुठे फिरायला जायला आवडेल याबाबत व्यक्त होत असतात. दरम्यान एका चाहत्याने अन्विताला हाच प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला अन्विताने आपल्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे. अन्विता फलटणकर सध्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. अभिनेत्रीला डान्सचीदेखील प्रचंड आवड आहे. त्यामुळेच ती सतत आपले डान्स व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची वाहवाह मिळवत असते. अशातच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर नुकतंच चाहत्यांसाठी ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवलं होतं.यामध्ये अन्विताने चाहत्यांच्या अनेक मजेशीर प्रश्नांना आपल्या हटके अंदाजात उत्तरे दिली आहेत. ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन दरम्यान चाहत्यांनी अन्विताला अनेक प्रश्न विचारली होती. अन्वितानेसुद्धा आपल्या चाहत्यांना हटके उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारलं पावसाळ्यात तुला कुठे फिरायला जायला आवडेल? यावर आपल्या हटके अंदाजात उत्तर देत अन्विताने सांगितलं सध्या तर घोडबंदर सोडून कुठेही नाही’. कारण यापूर्वीही अन्विताने सांगितलं होतं की, तिला घरात बसून पावसाच्या कोळणाऱ्या सरी पाहायला आवडतं. सोबतच अभिनेत्रीने पावसाळयात शाळेला जाताना होणारी फजिती शेअर करत आपल्याला जून महिना अजिबात आवडत नसल्याचं म्हटलं होतं.

(हे वाचा: Aai Kuthe Kay Karte:‘एका सीनसाठी करावी लागते अशी कसरत’, शूटिंगदरम्यानचा VIDEO होतोय VIRAL **)** झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून स्वीटूची भूमिका साकारत अभिनेत्री अन्विता फलटणकर घराघरात पोहोचली होती. देखणा,रुबाबदार अभिनेता आणि वजनदार,हळवी अभिनेत्री अशी वेगळी कथा घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील स्वीटू आणि ओमच्या केमिस्ट्रीने सर्वांनाच भुरळ पाडली होती. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या