Home / News / entertainment /

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका शेवटाकडे, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका शेवटाकडे, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर

झी मराठीची लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे.

झी मराठीची लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे.

झी मराठीची लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे.


मुंबई,13 फेब्रुवारी : मराठी मालिकांमध्ये सध्या नवी वळणं आलेली पाहायला मिळत आहेत. एकीकडे अग्गबाई सासूबाई या मालिकेत आसावरीचा मुलगा तिला पुन्हा कायमचं घरी आणण्यासाठी वेगवेगळी कारस्थान करताना दिसत आहे. तर अभिजीत पूर्ण कुटुंब एकत्र राहावं म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे झी मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजी लवकरच संपणार आहे. या आठवड्याचा टीआरपी लिस्टमध्ये मालिकांमध्ये होणाऱ्या चढउतारांमुळे काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे.

या आठवड्यातील टीआरपी लिस्टमध्ये टॉप 5 या झी मराठीच्याच मालिका आहेत. या लिस्टमध्ये 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको' मालिकाच्या रेटिंगमध्ये वाढ झाली असून ही मालिका आता तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या या मालिकेत सवतीमधील स्पर्धा त्यामुळे मदनची उडणारी तारांबळ पाहायला मिळत आहे. पण तरीही मदन चतुरीनं या दोघींनाही सांभळताना दिसत आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेनं ही मालिका एका अंकानं खाली घसरली आहे.

उर्वशी रौतेलानं जिममध्ये उचललं 120 किलोचं वजन, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

झी मराठीची लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे. झी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला. ज्यात मुघल सैन्य संभाजी राजेंना कैद करताना दिखवण्यात आलं आहे. या आठवड्याच्या टीआरपी लिस्टमध्ये ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. लवकरच ही मालिका संपणार आहे. मात्र या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आजारावर मात करत इरफान खानचं दमदार कमबॅक, पाहा Angrezi Medium Trailer

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका अग्गबाई सासूबाई ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणार येऊन थांबली आहे. सासूबाईंच्या लग्नासाठी शुभ्रा पुढाकार तर घेते पण खरी परिक्षा सुरू होते ती सासूबाईंच्या लग्नानंतर एकीकडे सोहम आईला कायमचं घरी आणण्यासाठी कारस्थान करत आहे तर दुसरीकडे आजोबा घरी येण्याचा रस्ता विसरतात. ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर आहे.

मालदीवच्या किनाऱ्यावर मौनी रॉयचा बोल्ड अंदाज, शेअर केले TOPLESS फोटो

कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' सेलिब्रेटी पॅटर्नमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. TRP रेटिंगमध्ये 'चला हवा येऊ द्या'नं दुसऱ्या स्थानावर कायम आहे. या शोनं प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच लोकप्रियता मिळवली आहे. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकानं पुन्हा एकदा टीआरपी लिस्टमध्ये अव्वल कायम ठेवलं आहे. या मालिकेतील माया या नव्या पात्रात एक वेगळीच रंगत आणली आहे.

मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही TPR लिस्टमध्ये Zee Marathi च्या मालिकांनीच बाजी मारली आहे. टॉप 5 मध्ये सर्व मालिका या Zee मराठीच्या आहेत.

तेजश्री प्रधाननं पहिल्याच बॉलिवूड सिनेमात दिला LIP LOCK सीन, पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: February 13, 2020, 16:32 IST