स्वप्नील जोशी
मुंबई, 23 फेब्रुवारी: मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशी ओळखला जातो. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने आज मराठी मालिका, चित्रपट, सोबतच वेबसिरीज मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या स्वप्नील जोशी झी मराठीवरच्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याची ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली तर काही प्रेक्षक वेळोवेळी या मालिकेवर टीका देखील करतात. असंच ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला स्वप्नीलनं सडेतोड उत्तर दिलं आहे. स्वप्निल जोशीचं सोशल मीडियावर सुद्धा चांगलंच फॅन फॉलोईंग आहे. हा अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. स्वप्निल सतत आपले फोटो आणि व्हिडोओ शेअर करत असतो. यासोबतच वेळोवेळी तो चाहत्यांसोबत संवाद देखील साधत असतो, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. नुकतंच स्वप्निल जोशीने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतले. यावेळी त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने स्वप्निलला एक बोचरा सल्ला दिला पण त्याला अभिनेत्याने दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा आहे. हेही वाचा - Javed Akhtar: जावेद अख्तर यांना रुचलं नाही कंगनानं केलेलं कौतुक; म्हणाले ‘मी तिला फार महत्त्व…’ ट्विटरवर स्वप्नीलला एका नेटकऱ्याने ‘चांगल्या मराठी मालिकांमध्ये काम करत जा’असा सल्ला दिला. त्यावर उत्तर देत स्वप्निल म्हणाला, ‘आणि चांगलं काय।? हे कोण ठरवणार।!? तिथे गोंधळ आहे !.’ यावर त्या व्यक्तीने पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘ते प्रेक्षक ठरवतील. पण एक चांगला अभिनेता म्हणून तुला अशा मालिकेत पाहायला आवडत नाही’. त्यावर स्वप्निल जोशीने ‘नोंद घेतलीय’ असे म्हटले आहे.
पण याचवेळी स्वप्नीलने नोंद घेतली असली तरी चाहते मात्र त्याचं समर्थन करत त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एका चाहत्याने त्या ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला संबोधत, ‘आपली आपली चॉईस असते, कोणाला गोड आवडत नाही कोणाला नाईलाजाने कार्ले खावी लागतात आणि त्यालाच गोड मानव लागते.. मराठी सिरियल्स छान असतात पाहणार्यांना दृष्टिकोन असायला हव… श्रीकृष्ण पासून checkmate, समांतर, बळी, walvi पर्यंत चा प्रवास बहुतेक महाशयांनी पाहिला नसाव…’ अशी कमेंट केली आहे.
स्वप्नीलने केलेला हा संवाद आता सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. स्वप्निलच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर अभिनेता सध्या मालिकेत तर काम करत आहेच,शिवाय नुकताच तो वाळवी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. येणाऱ्या काळात तो ‘सुटका’ या सिनेमात झळकणार आहे.