JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Swapnil Joshi : जेव्हा स्वप्नीलने आईचा जीव वाचण्यासाठी सिद्धिविनायकाकडे घातलं होतं साकडं

Swapnil Joshi : जेव्हा स्वप्नीलने आईचा जीव वाचण्यासाठी सिद्धिविनायकाकडे घातलं होतं साकडं

स्वप्नील त्याच्या आईवडिलांसोबत एकत्र राहतो. तो त्याच्या आई वडिलांचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो त्याच्या आयुष्यात ‘तुमच्या आई-वडीलांची साथ असणं हिच तुमची खरी संपत्ती आहे’ असे मानतो. त्याच्या या विचारांमुळे चाहते त्याचं नेहमी कौतुक करतात.

जाहिरात

swapnil joshi with mother

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 ऑगस्ट : मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाला किती महत्व आहे याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. तो त्याच्या अभिनयामुळे  प्रेक्षकांना आवडतोच  पण तो त्याच्या आई वडिलांवर असलेल्या प्रेमामुळे चाहत्यांची मनं जिंकून घेतो. सध्या  स्वप्नील जोशी आणि त्याच्या आईची एक  मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याची आई स्वप्नीलचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या व्हिडिओमध्ये स्वप्निलच्या मातृप्रेमाबद्दल माहिती कळतेय. ही गोष्ट शेअर करताना स्वप्निल आणि त्याची आई दोघेही भावुक झाले आहेत. स्वप्नीलच्या  ‘भिकारी’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळेसची ही मुलाखत आहे. या चित्रपटात दाखवल्या प्रमाणेच खऱ्या आयुष्यातही स्वप्नीलने त्याच्या  आईसाठी एक  कृती केली होती. स्वप्नीलची आई त्याच  प्रसंगाबद्दल माहिती सांगत आहेत.  हे ऐकून स्वप्नीलचे चाहतेही भावुक झाले आहेत. स्वप्नील जोशीच्या ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना - भिकारी’ या चित्रपटाला आज पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटात स्वप्नीलने सम्राट ही भूमिका निभावली होती. त्यामध्ये तो करोडपती माणूस असतो पण आईच्या जीवासाठी तो भिकारी म्हणून वावरतो. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले होते. पण स्वप्निलच्या खऱ्या आयुष्यातही त्याला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. आईचा जीव वाचावा म्हणून त्याने काय केलं होतं  हे खुद्द स्वप्निलच्या आईनेच सांगितलं आहे. हेही वाचा - Kareena Kapoor: सीतेच्या भूमिकेसाठी 12 कोटी मानधन घेतल्याच्या आरोपावर करिनाने दिलं स्पष्टीकरण स्वप्नीलची आई म्हणतेय, ‘मला २००६ साली  हार्ट अटॅक आला होता. तेव्हा स्वप्नीलने माझी आई  ठणठणीत  होऊ दे म्हणून सिद्धिविनायकाकडे साकडं घातलं होतं.’ स्वप्नीलने ‘माझी आई ठणठणीत बरी झाली तर गिरगाव पासून सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी 11 वेळा चालत येईल’ असा नवस केला होता. त्यानंतर त्याची आई पूर्णपणे बरी झाली. स्वप्निलच्या मातृप्रेमाचा हा प्रसंग सांगताना स्वप्नील आणि त्याच्या आईचे डोळे पाणावले आहेत.

संबंधित बातम्या

स्वप्नील त्याच्या आईवडिलांसोबत एकत्र  राहतो. त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती. त्यातही त्याने आईवडिलांचं महत्व किती आहे ते समजावून सांगितलं होतं. तो म्हणाला होता कि, ‘तुमच्या आई-वडीलांची साथ असणं हिच तुमची खरी संपत्ती आहे. बाकी सगळ्या सुखांची खरेदी करता येते पण आई वडिलांचं प्रेम जपायला हवं ते दुसरीकडे कुठेच मिळत नाही.’ तेव्हाही त्याचे चाहते खुश झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या