मुंबई, 11 जुलै: अभिनेता स्वप्नील जोशी ( Swapnil joshi ) सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आजही त्याने एक इंटरेस्टींग फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्वप्नील जोशीला एक इटालियन खाणारी ( Italian Food) मुलगी भेटली आहे. तिचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही मुलगी त्याच्यासाठी नक्कीच कोणीतरी खास दिसत आहे. कोण असेल ही मुलगी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? ही इटालियन खाणारी मुलगी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आहे. स्वप्नीलने तेजस्विनी पंडितचा फोटो ‘इटालियन खाणारी चिनी मुलगी’ असं म्हणत सोशल मीडियावर शेअर केला आहे. खरंतर स्वप्नील जोशीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तेजस्विनी पंडित शूटिंग मूड ( Tejaswini Pandit New Shoot) मध्ये दिसतेय. त्यामुळे स्वप्नील आणि तेजस्विनी पंडित एकत्र काही शूट करत आहेत का? ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का? अश्या चर्चा सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरू आहेत.
हेही वाचा - व्यायाम करण्याआधी करा ‘हे’ काम, पावनखिंड फेम अभिनेत्याचा भन्नाट फिटनेस फंडा तेजस्विनी पंडित अलीकडेच ‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये झळकली होती. या भूमिकेसाठी तिचे सर्वच स्तरावर कौतुक झाले होते. तर स्वप्नील जोशी सध्या झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. दोघेही आता पुन्हा एकत्र दिसणार असणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दोघांच्या नव्या सिनेमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. खरंतर स्वप्नील आणि तेजस्विनीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. ते दोघे ‘तू ही रे’ (Tu hi re) चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर ‘समांतर’ या वेब सिरीजच्या दोन्ही सीझनमध्ये ते दोघे एकत्र झळकले होते. आता स्वप्नीलने शेअर केलेल्या तेजस्विनी पंडितच्या फोटोवरून तर असंच दिसतंय की दोघे लवकरच सोबत एकत्र काम करताना दिसणार आहेत. पण ते कोणत्या भूमिका साकारतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे.