JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बहीण सुनैनाच्या आरोपांनंतर हृतिकच्या मदतीला धावून आली एक्स वाइफ सुजैन खान

बहीण सुनैनाच्या आरोपांनंतर हृतिकच्या मदतीला धावून आली एक्स वाइफ सुजैन खान

sunaina roshan sussane khan रंगोलीच्या ट्वीटनंतर सुजैननं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. नुकतेच कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिनं हृतिक रोशन त्याची बहीण सुनैनाला मारहाण करत असल्याचा आरोप केला. रंगोलीच्या ट्वीटनुसार सुनैना दिल्लीतील एका मुस्लीम मुलावर प्रेम करत असल्यानं हृतिक आणि त्यांचे कुटुंबीय तिला मारहाण करतात तसेच घरात कोंडून ठेवतात. त्यामुळे सुनैनानं कंगनाला फोन करून तिच्याकडे मदतही मागितली होती असा दावा रंगोलीनं केला आहे. यासंबंधीचे सर्व मेसेज आणि कॉल्स आम्ही पुरावे म्हणून सांभाळून ठेवल्याचं रंगोलीनं तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या सर्व प्रकरणानंतर हृतिकची पूर्व पत्नी सुजैन खान आता हृतिकच्या मदतीला धावून आली आहे. रंगोलीच्या ट्वीटनंतर सुजैननं तिच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. जोडी असावी तर अशी! भावाच्या लग्नात बॉयफ्रेंडसोबत सुश्मिता सेनचा रोमँटिक डान्स

सुजैन खाननं तिच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहिलं, ‘बराच मोठा काळ मी या कुटुंबाची सदस्य होते. त्यामुळे माझ्या अनुभवांच्या आधारे मी सांगू इच्छिते, सुनैना एक चांगली आणि मनमिळावू व्यक्ती आहे. पण सध्या ती तिच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहे. तिचे वडील नुकतेच एका गंभीर आजारातून सावरले आहेत. तसेच आईचीही मनस्थिती काहीशी ठीक नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की, कृपया सर्वांनी त्यांच्या खासगी आयुष्याचा सन्मान करावा. प्रत्येकाच्या कुंटुंबात अशी परिस्थिती कधी ना कधी येत असते.’ रणवीर सिंगवर लागला चोरीचा आरोप, WWE रेसलरने घेतलं फैलावर

काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन हिनं तिच्या ट्विटर अकाउंट केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. ज्यात तिनं ती नरकात जगत असल्याचं म्हटलं होतं. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, मला वाटलं नव्हतं मी कधी अशाप्रकारचं आयुष्य अनुभवेन. एकीकडे सुनैनाचे असे ट्वीट व्हायरल होत असतानाच दुसरीकडे तिचं मानसिक संतुलन बिघडल्याचं बोललं जात आहे. मात्र आपल्याला काहीही झालं नसून तब्बेत एकदम ठणठणीत बरी आहे असं सुनैनानं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. याशिवाय ट्विटरवर एक पोस्ट करत तिनं कंगना रनौतला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. Photo- लंडनच्या रस्त्यांवर एकमेकात गुंतले ‘विरुष्का’, जगाचा पडला विसर

जाहिरात
जाहिरात

========================================================== VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या