JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतच्या थेरपिस्टच्या वक्तव्यानं आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, रियाची बाजू घेत म्हणाल्या...

सुशांतच्या थेरपिस्टच्या वक्तव्यानं आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, रियाची बाजू घेत म्हणाल्या...

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) थेरपिस्टने रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) पाठिंबा दिला आहे आणि त्या हे मानतात की सुशांतचा सर्वात भक्कम सपोर्ट रिया होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूप्रकरणी रोज नवे खुलासे केले जात आहेत. सुरुवातीला त्याच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आणि आउटसायडर्सना मिळणारी वागणूक यावर वादंग उठला. त्यानंतर सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केली. यानंतर या घटनेचे विविध पैलू मांडले जात आहेत. यामध्ये रियावर आणखी एक आरोप केला जात आहे की, रिया सुशांतला तपासणीशिवाय नैराश्या संदर्भातील औषधे देत होती. आता या प्रकरणी सुशांतच्या थेरपिस्टने वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, (हे वाचा- धक्कादायक! कंगनाच्या घराजवळ गोळीबार? अभिनेत्रीची सुरक्षा वाढवली ) सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्याबाबत रोज नवे वादंग सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले की, सुशांत अजिबात नैराश्यामध्ये नव्हता. आता हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार सुझेन वॉकर (Susan Walker) यांनी अशी माहिती दिली आहे की, सुशांत नैराश्य आणि हायपोमेनियाशी (depression and hypomania) लढत होता. या काळात रिया त्याचा भक्कम आधार होती. या अहवालानुसार थेरपिस्टच्या मते सुशांतची परिस्थिती खूप गंभीर होती. (हे वाचा- SSR Death Case: ‘प्रकरण दडपण्यासाठी ठाकरे सरकारवर माफिया आणि बॉलिवूडचा दबाव' ) वॉकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, सुशांत नैराश्य आणि बायपोलर या समस्येशी लढत होता. त्या पुढे असे म्हणाल्या की, ‘सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडियावर यासंदर्भात काही चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे मला यासंदर्भात पुढे यावे लागत आहे. मी सुशांत आणि रियाला अनेक वेळा भेटले आहे. 2019 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यानंतर आता जूनमध्ये देखील रियाशी बातचीत झाली होती.’ या थेरपिस्टच्या म्हणण्यानुसार रिया आणि सुशांतमध्ये प्रेम दिसत होते. रिया फक्त त्याच्या अपॉइंटमेंट घ्यायची नाही तर त्यासाठी उपस्थित राहण्याची हिंमत देखील ती त्याला देत असे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या