आशिष सिंह, मुंबई, 01 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येप्रकरणी त्याचे चाहते आणि सेलिब्रिटींकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. वांद्रे पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सुशांतने हे पाऊल का उचललं याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. 30 जून रोजी त्याच्याबरोबर शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) मध्ये ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, त्या संजना सांघी (Sanjana Sanghi)ची चौकशी करण्यात आली. संजनाची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली. 9 तास झाली चौकशी मंगळवारी संजना सांघी वांद्रे पोलीस स्थानकात पोहोचली होती. पोलिसांनी जवळपास 9 तास तिची चौकशी केली. या 9 तासांच्या चौकशीमध्ये सुशांतवर करण्यात आलेले #metoo चे आरोप त्याचबरोबर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तो डिप्रेशन मध्ये होता का याबाबत काही सवाल संजनाला विचारण्यात आले. संजनाने अशी माहिती दिली की, 2018 मध्ये ऑडिशननंतर कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा यांनी तिची निवड या सिनेमासाठी तिची निवड केली होती. मुकेश छाबडाच ‘दिल बेचारा’चे दिग्दर्शक आहेत. त्यानंतर तिला माहित झाले की सुशांत तिच्याविरुद्ध भूमिकेत आहे. सिनेमाच्या सेटवरच दोघांची भेट झाली होती. #metoo बाबत बोलली संजना संजनाने पोलिसांना अशी माहिती दिली की, तिने सुशांतवर कधी मीटूचा आरोप लावला नव्हता किंवा अशी घटना देखील कधी घडली नव्हती. जेव्हा #metoo हे कॅम्पेन 2018 मध्ये सुरू होते, त्यावेळी कुणीतरी अशी अफवा पसरवली की सुशांतने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मात्र मी असा आरोप कधीच केला नव्हता, अशी प्रतिक्रिया संजनाने दिली आहे. ‘जेव्हा हे आरोप करण्यात आले तेव्हा मी माझ्या आईबरोबर यूएसमध्ये फिरण्यासाठी गेले होते. मला तर याबद्दल माहित नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला याबाबत माहित झाले’, असेही संजना यावेळी म्हणाली. (हे वाचा- मला सिनेमातून काढून टाकण्यात आलं होतं कारण… घराणेशाहीवर बोलली प्रियांका चोप्रा ) संजनाने पोलिसांना अशी माहिती दिली की अमेरिकेतून परतल्यावर तिने सोशल मीडियावर असे स्पष्टीकरण देखील दिले होते की, याप्रकारची कोणती घटना घडली नाही आहे.
या घटनेनंतर सुशांत डिप्रेशनमध्ये आल्याची माहिती संजनाने पोलिसांना दिली आहे. तिने सुशांत आणि मुकेश छाबडा या दोघांचीही भेट घेतली होती. सुशांतने याबाबत तिच्याशी बातचीत केली होती. त्याला बदनाम केल्याचा कट रचल्याचं भाष्य त्याने संजनाजवळ केले होते. हे आरोप नाकारण्यासाठी सुशांतने त्यांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर शेअर केले होते, अशी माहिती संजनाने दिली. ते आरोप निव्वळ अफवा असल्याचे संजना म्हणाली. (हे वाचा- सुशांत सिंह राजपूतला ‘शुद्ध देसी रोमान्स’साठी मिळाले होते 30 लाख) सिनेमाचे शूटिंग सुरु झाल्यानंतर देखील सुशांतला रिकव्हर होण्यासाठी काही वेळ गेला होता. या दरम्यान मुकेश छाबडा त्यांच्याबरोबर होते, पण त्यांना याबाब माहिती नव्हती की त्याच्याकडे कोणते चित्रपट आहेत आणि कोणते नाहीत. संपादन - जान्हवी भाटकर