सुशांत सिंह राजपूतची शेवटची इच्छा राहिली अपूर्णच
मुंबई, 6 जुलै- अभिनेता सुशांत सिंह राजपूत जाऊन तीन वर्षे झाली आहेत. चाहते आजही त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला उत्सुक असतात. त्याचं काम आजही लोकं विसरू शकलेले नाहीत. त्याच्या जाण्याचा धक्का आजही चाहते पचवू शकलेले नाहीत. त्याच्या मृत्यूचे गुढ अजूनही उलगडले नसले तरी त्याची एक इच्छा मात्र अपुरी राहिली.. सुशातं सिंह एक इच्छा होती, त्यानं त्याच्या जवळच्या व्यक्तीला ती बोलून देखील दाखवली होती. ती इच्छा काय होती याबद्दल आपण जाणून घेणार आहे. सुशांतने खूप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जीवावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. छोट्या पडद्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास बॉलीवूडच्या सुपरहिट ‘छिछोरे’ सिनेमापर्यंत येऊन पोहोचला. पुढे ‘दिल बेचेरा’ हा त्याचा शेवटचा सिनेमा ओटीटीवर आला आणि सगळेच हळहळले. त्याचं असं अचानक जाणं लोकांना आजही पटलेलं नाही. आजही चाहते त्याला मिस करतात, त्याचं काम मिस करतात. ‘छिछोरे’ हा काही सुशांतचा शेवटचा सिनेमा नव्हता, खरा सिनेमा तर त्याच्या कल्पनेत होता, जो करणं ही त्याची शेवटची इच्छा होती. त्यानं त्याची ही इच्छा त्याच्या जवळच्या व्यक्तीला देखील बोलून दाखवली होती. वाचा- सुशांत सिंहचं ‘ते’ सिक्रेट क्रितीला होतं माहित, मृत्यूच्या 3वर्षांनी केला खुलासा सुशांत विज्ञानप्रेमी होता. अभिनेता असला तरी त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. तो सिनेमात प्रचंड मेहनत करून पैसे कमावत होता कारण त्याला स्वतःचा चित्रपट करायचं होता. जो विज्ञानावर आधारित असेल. ‘चंदा मामा दूर के’ असं ह्या सिनेमाचं नाव त्याने निश्चित केलं होतं. या चित्रपटासाठी तो प्रचंड अभ्यास करत होता शिवाय चित्रपट पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी होती. याबाबत स्वतः दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी माहिती दिली होती. अभिषेक चौबे यांना सुशांतची इच्छा माहिती होती. त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली. सुशांतची जवळची मैत्रीण क्रितीनं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे.क्रिती सेननने तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ ठेवले असून त्याचा लोगोही ब्लू बटरफ्लाय असाच आहे.. क्रितीच्या या घोषणेनंतर सुशांतचं एक जुनं संभाषण व्हायरल होत आहे. Reddit वर फॅन आणि सुशांतमध्ये हा संवाद झाला होता. ज्यामध्ये चाहत्याच्या लक्षात आले की, सुशांतने त्याच्या पोस्टमध्ये ब्लू बटरफ्लाय इमोजीचा खूप वापर केला आहे. यामुळे सुशांत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सुशांतनं सांगितले होते सिक्रेट सुशांतने ब्लू बटरफ्लाय इमोजीचं सिक्रेट सांगत लिहिले होते की, हे सुरुवातीचे प्रतीक आहे, कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाणे, ते तुमचे आणि माझे आणि आपल्या सर्वांचे प्रतीक आहे. ज्यांच्यावर विश्वास आहे अशा भावना व्यक्त करणे, जीवनातील उलथापालथीचा अर्थ समजावून सांगणे. हा तुझ्याच आवाजाचा प्रतिध्वनी आहे. तच्या या निळ्या फुलपाखराचे रहस्य काय आहे हे फक्त क्रितिला माहित होते आणि तिने त्याचा सुंदर वापर केला आहे.