JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bas Bai Bas: शरद पवारांच्या घरात शिंदेंचं राज्य; 'बस बाई बस'मध्ये सुप्रिया सुळेंनी केली पोलखोल

Bas Bai Bas: शरद पवारांच्या घरात शिंदेंचं राज्य; 'बस बाई बस'मध्ये सुप्रिया सुळेंनी केली पोलखोल

बस बाई बस या कार्यक्रमाची रंगत अगदी सुरुवातीपासूनच वाढणार हे आलेल्या पाहुण्यांमुळे नक्की होताना दिसत आहे. या कार्यक्रमाबद्दल वेगळीच उत्सुकता बघायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जुलै: झी मराठीवर येत्या आठवड्यात बस बाई बस हा नवाकोरा कार्यक्रम दाखल होताना दिसणार आहे. यामध्ये सुबोध भावे लेडीज स्पेशल अशी राखीव बस घेऊन येणार आहे ज्यात काही निवडक स्त्री प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्त्री सेलेब्रिटीशी मनमोकळ्या गप्पा मारायला मिळणार आहे. या कार्यक्रमात लवकरच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याचं समोर येत आहे. सुबोध भावेने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये सुप्रिया सुळे (supriya sule in bas bai bas) या काही महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसणार आहेत. राजकारणी हे नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत असतात. सुप्रिया सुद्धा राजकारण हा विषय बाजूला ठेऊन त्यांच्या घरातील वातावरणाबद्दल बोलताना दिसणार आहेत. या नव्या प्रोमोमध्ये एक महिला त्यांना पवार घराण्यात स्त्रियांचं असलेलं वर्चस्व तसंच घरातील मालमत्तेवरील हक्क याबद्दल विचारणा करताना दिसत आहे. पवार घराण्यातील पुरुष हे राजकारणात बरेच सक्रिय आहेत. शरद पवार आणि अजित पवार ही काका पुतण्याची जोडी राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहेत. तसंच सुप्रिया सुळे सुद्धा राजकारणात बऱ्याच सक्रिय आहेत. या निमित्ताने सुप्रिया यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी, राजकारणाशी त्यांच्या घराचं असलेलं नातं आणि घरचं राजकीय वातावरण याबद्दल बरीच रंजक माहिती मिळताना दिसणार आहे. नेहमीच भरपूर नात्याने भरलेल्या राजकारणाच्या पटाची एक बाजू सोडता त्याची एक वेगळी बाजू सुप्रिया यांच्या बोलण्यातून नक्कीच समजेल अशी आशा व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

तसंच प्रोमोमध्ये सुप्रिया या राजकारणातील आजच्या परिस्थितीवर सुद्धा काही प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, “मी आता घरी खूप चिडवतो कारण आता पवार विरुद्ध शिंदे आहे. माझ्या बाबांचं आडनाव पवार तर आईचं शिंदे असल्याने अशाही अर्थाने ते लागू होतं.” हे ही वाचा-  महेश मांजरेकर नव्हे तर हा अभिनेता होणार ‘बिग बॉस’; Big boss marathi season 4 होस्ट करणार एकूणच या कार्यक्रमाची एकदम जोरदार सुरुवात होणार असे संकेत मिळत आहेत. महिलांच्या येणाऱ्या बेधडक प्रश्नांना उत्तर देण्याशिवाय सुटका नाही हे सुद्धा प्रोमोमध्ये कळून येत आहे. एकूणच या नव्या प्रोमोमुळे कार्यक्रमाबद्दल उत्सुकता भलरीच वाढल्याचं समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या