JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Braveheart! सर्जरीनंतर साप पकडताना दिसला कॉमेडियन सुनील ग्रोव्हर; पाहा VIDEO

Braveheart! सर्जरीनंतर साप पकडताना दिसला कॉमेडियन सुनील ग्रोव्हर; पाहा VIDEO

सुनील ग्रोव्हरने नुकताच इन्स्टाग्रामवर (Sunil Grover Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुनील कॅमेरामनला शांत राहून पुढे जाण्यास सांगतो आणि तो स्वत: हळूहळू एका सापाजवळ जातो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 एप्रिल : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची (Sunil Grover) फेब्रुवारी महिन्यात हार्ट ब्लॉकेजची सर्जरी झाली. कपिल शर्माची (Kapil Sharma) साथ सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर काही मोजक्या चित्रपटांमध्ये दिसला, त्यानंतर मध्येच त्याची हार्ट सर्जरी झाल्याचं कळालं. त्यानंतर आता सुनीलचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत सुनील सापाशी खेळताना दिसतोय. सुनीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुनील ग्रोव्हरने नुकताच इन्स्टाग्रामवर (Sunil Grover Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुनील कॅमेरामनला शांत राहून पुढे जाण्यास सांगतो आणि तो स्वत: हळूहळू एका सापाजवळ जातो. त्याच्या हातात एक छोटी काठी दिसतेय आणि तो ती काठी त्या सापाजवळ घेऊन जातो. मग तो घाबरतच एका झटक्यात हाताने साप उचलतो. मात्र नंतर कळतं की सुनीलने ज्याला साप समजून उचललं तो साप नसून पाइप आहे. तेव्हा सुनील सॉरी हा साप नाही तर पाईप आहे, असं म्हणतो आणि व्हिडिओ संपतो. PHOTOS : सोनाली कुलकर्णीचा ब्लू ब्लेजरमध्ये स्टनिंग अंदाज, क्लासी लुकवर खिळल्या नजरा! सुनीलने हा व्हिडिओ टाकल्यानंतर चाहते त्याच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सुनीलच्या कॉमिक टायमिंगचं चाहते कौतुक करत आहेत. अनेकांनी त्यावर हसणारे इमोजी टाकले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला असलेले सुनीलच्या चेहऱ्यावरचे गंभीर हावभाव व्हिडीओच्या शेवटापर्यंत नेटकऱ्यांना खिळवून ठेवणारे होते. त्याच्या अभिनयाचंदेखील चाहते कौतुक करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

सुनील ग्रोव्हरचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. उत्तम कॉमेडियन असण्यासोबतच तो एक अप्रतिम अभिनेतादेखील आहे. सुनीलने अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’मधील त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि कॉमिक टायमिंगसह पंचेससाठी तो ओळखला जात होता. कपिल शर्मासोबतच्या वादामुळे त्याने शो सोडला, परंतु त्याने साकारलेलं गुत्थी नावाचं पात्र आजही लोकांच्या आठवणीत कायम आहे. Hridaynath Mangeshkar Hospitalized: पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल; जाणून घ्या लेटेस्ट हेल्थ अपडेट शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर परत येईल, असे सतत अंदाज लावले जात होते. परंतु, त्याने कधीही या अंदाजांवर प्रतिक्रिया दिली नाही. तो दुसरे शो, वेब सीरिज आणि चित्रपट करत राहिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लॅटमध्ये कपिलशी त्याचं भांडण झालं होते. त्यानंतर त्याने कपिलचा शो सोडला. पुन्हा कधीच कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांनी एकत्र स्टेज शेअर केलेलं नाही. सुनील सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याची हार्टची सर्जरी झाल्यानंतर चाहते त्याची तब्येत लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत होते. दरम्यान, आता सुनील ग्रोव्हर पूर्णपणे बरा झाला असून त्याचे राहिलेले प्रॉजेक्ट्स पूर्ण करतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या