Home /News /mumbai /

Hridaynath Mangeshkar Hospitalized: पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल; जाणून घ्या लेटेस्ट हेल्थ अपडेट

Hridaynath Mangeshkar Hospitalized: पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल; जाणून घ्या लेटेस्ट हेल्थ अपडेट

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar Hospitalized) यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही आहे.

    मुंबई, 25 एप्रिल: ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar Hospitalized) यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना 08-10 दिवसात डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिल्यांदाच 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळा पार पडला. या दरम्यान पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar Son Adinath Mangeshkar) यांनी याबाबत माहिती दिली. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये पहिला  'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ मंगेशकर उपस्थित होते. यावेळी आदिनाथ मंगेशकर यांनी अशी माहिती दिली की, त्यांचे वडील पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळ्यादरम्यान संबोधित करताना आदिनाथ मंगेशकर म्हणाले की, माझे वडील नेहमी स्वागताचे भाषण करायचे आणि ट्रस्टविषयी माहिती देत असत. मात्र यावर्षी ते हे काम करू शकत नाहीत कारण ते सध्या रुग्णालयात आहेत. हे वाचा-'चार दशकांपूर्वी सुधीर फडकेंनी लतादीदींशी ओळख करुन दिली', पंतप्रधान मोदींकडून सूरसम्राज्ञीच्या आठवणींना उजाळा पंडित हृदयनाथ मंगेशकर हे 84 वर्षांचे आहेत.आदिनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार 8-10 दिवसात ते घरी परततील. हृदयनाथ मंगेशकरांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशीही माहिती आदिनाथ मंगेशकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते आहेत, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकर यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा देत भाषणाला सुरुवात केली. हे वाचा-राणा दाम्पत्याला भिडणाऱ्या 'फायरब्रँड' आजीच्या घरी पोहोचले ठाकरे कुटुंब, म्हणाले, 'झुकेंगा नहीं' मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 80 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचा एक भाग म्हणून रविवारी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. एका निवेदनात मंगेशकर कुटुंबीय आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने यापूर्वी याबाबत माहिती दिली होती की, त्यांनी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. लता मंगेशकर यांनी फेब्रुवारीमध्ये जगाचा निरोप घेतला, त्या 92 वर्षांच्या होत्या. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये लता मंगेशकर सर्वात मोठ्या होत्या.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Lata Mangeshkar - लता मंगेशकर, Singer

    पुढील बातम्या