मुंबई, 31 डिसेंबर : गायिका सुनिधी चौहान बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखली जाते. तिनं आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तिचं योगदान खूप महत्त्वाचं मानलं जातं. मात्र जेव्हा सुनिधी घरी असताना गाते आणि तिचा लहान मुलगा यात तिला साथ देतो त्यावेळी नक्की काय होतं हे नुकतंच एका व्हिडीओमधून समोर आलं. सुनिधी आणि तिचा मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सुनिधी चौहाननं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती ‘कटते नहीं कटती…’ हे मिस्टर इंडिया या सिनेमातील गाणं गाताना दिसत आहे आणि तिचा लहान मुलगा तिला या गाण्यात साथ देताना दिसत आहे. सुनिधी प्रमाणंच तिचा मुलाचा आवाजही खूप गोड आहे आणि जेव्हा तो बोबड्या बोलांमध्ये गातो तेव्हा ते अधिकच गोड वाटतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. कृष्णा श्रॉफनं शेअर केले बॉयफ्रेंडसोबत BOLD PHOTO, भाऊ टायगरनं केली ‘ही’ कमेंट
सुनिधीच्या प्रोफेशनल लाइफसोबतच ती तिच्या पर्सनल लाइफमुळे सुद्धा अनेकदा चर्चत राहिली. तिनं 2002 साली बॉबी खानशी लग्न केलं होतं मात्र अवघ्या 1 वर्षांतच त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2012मध्ये तिनं हितेश सोनिक याच्याशी लग्न केलं. या दोघांनी 1 वर्षाचा एक ‘तेघ’ नावाचा मुलगा आहे. सुनिधीनं आतापर्यंत हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये 2000 पेक्षा जास्त गाणी गायलि आहेत. आली लग्नघटी…! नेहा पेंडसेच्या घरी सुरू झाली लगीनघाई, पाहा Exclusive Photos ‘तू माझा पुन्हा एकदा विश्वासघात केलास’, सैफ अली खानवर भडकली काजोल