मुंबई, 28 जुलै- बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकांमधील एक महत्वाचं नाव म्हणजे सुनिधी चौहान हे होय. सुनिधीने आपल्या आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिनेत्रीने अनेक भाषांमध्ये सुंदर-सुंदर गाणी गायिली आहेत. सुनिधीने मराठीमध्येही काही गाणी गायिली आहेत. परंतु आता गायिकेने मराठाती पहिल्यांदाच चक्क एक ‘अंगाई गीत’ गायिलं आहे. सध्या या गाण्याची प्रचंड चर्चा आहे. मराठीतील प्रसिद्ध गीतकार-गायक सलील कुलकर्णी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये एक सुंदर व्हिडीओसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हे अंगाई गीत ऐकून अनेकांना भरुन येत आहे. आईच्या मायेची ऊब, अंगाईतील तो गोडवा,प्रेम आणि आईच्या कुशीतील ते सुंदर जग याची प्रत्येकालाच जाणीव होत आहे. सुनिधी चौहानच्या आवाजातील ही अंगाई अनेकांना भुरळ पाडत आहे. सलील कुलकर्णी पोस्ट- ‘‘अंगाई नुसतं गाणं नसतं… ती आईच्या हृदयाची स्पंदनं असतात… आईने प्रेमाने, मायेने गायलेली अंगाई ही कोणत्याही वयातील मुलाला/मुलीला कायमच हवीहवीशी वाटते… अशीच सुंदर अंगाई प्रसिद्ध गायिका सुनिधि चौहान यांनी ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटासाठी गायली आहे. सुनिधि यांनी गायलेली ही पहिली मराठी अंगाई आहे… नक्की ऐका!’’
**(हे वाचा:** Priya Bapat: प्रिया बापटने चाहत्यांना दिलं अनोखं चॅलेंज; शेअर केला उमेश सोबतचा थ्रोबॅक फोटो ) ‘एकदा काय झालं’ या आगामी चित्रपटातील ही अंगाई सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातून अभिनेत्री उर्मिला कोठारे बऱ्याच वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. लेक जिजाच्या जन्मानंतर उर्मिलाचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता सुमित राघवनसुद्धा असणार आहे. या चित्रपटाची काही गाणी शंकर महादेवन यांनीसुद्धा गायिली आहेत.