दोस्तीसाठी व्हावं लागतं Zomatoअन् Swiggy! अक्षयासाठी मैत्रिणींनी डिलिव्हर केला 'हा' खास पदार्थ
मुंबई, 21 जून: सुंदरा मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharli) मालिकेतील सर्वांची लाडकी लती ( Latika) म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. त्याहूनही ती फार खोडकर आणि प्रेमळ आहे. मालिकेच्या सेटवर अभिनेत्री गौरी किरण आणि अभिनेत्री अदिती द्रवीड यांची चांगलीच मैत्री झाली आहे. तिघीही मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. अक्षया सध्या तिच्या पायाला दुखापत झाल्यानं घरी आराम करत होती. अक्षया जितकी अभिनयसाठी वेडी आहे तितकीच ती खाण्यासाठी ही वेडी. अक्षया फार फुडी आहे हे तिच्या चाहत्यांनाही माहितीच असेल. म्हणून आराम करत असताना मैत्रिणींनी तिच्यासाठी तिचा आवडीचा पदार्थ आणला. जो पाहून अक्षयाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. अक्षयाच्या पायाला दुखापत झाल्यानं ती घरी होती. तिला तिचा आवडता पदार्थ खाण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन कोणी वर्सोवा ठाणे प्रवास करणार असाल तर मला तो पदार्थ घेऊन या असं म्हटलं होतं. अक्षयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिनेत्री गौरी किरण आणि अभिनेत्री अदिती द्रवीड अक्षयासाठी तिचे आवडते सुरज लामा मोमोस आणले.
हेही वाचा - Reema Lagoo: सलमानच्या रील लाईफ आईला बॉलिवूडमध्ये का मिळाल्या टिपिकल भूमिका? मोमोज पाहून अक्षयाला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तिनं मोमोज खातानाचा एक धम्माल व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती बेडवर पायाला पट्टा लावून बसलेली दिसतेय. एका हातात मोमोजची डिश घेऊन अदितीशी बोलत आहे. अक्षयानं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, ‘फ्रेंडशिप लेव्हल 1000 अनलॉक. माझे आवडते सुरज लाला मोमोज खाण्याचं क्रेव्हिंग मला होत होतं म्हणून वर्सोवा टू ठाणे असा प्रवास करुन किरण आणि अदितीमुळे मला मोमोज मिळाले’. मैत्रिणींचं हे प्रेम पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केलाय. चाहत्यांनी म्हटलंय, ‘तुम्हा तिघींना खूप प्रेम, तुमची मैत्री अशीच राहो’. एका युझरनं म्हटलंय, ‘थ्री लव्हली गर्ल’, तर दुसऱ्या युझरनं अक्षयाला ‘लवकर बरी हो’, असं म्हटलंय. जवळपास 8 दिवसांच्या बेड रेस्टनंतर अक्षया पुन्हा एकदा मालिकेच्या शुटींगवर परतली आहे. दरम्यान सुट्टीवर असताना अक्षयानं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती फारचं खुश दिसतेय. पायाला दुखापत झालेली असतानाही तिचा उत्साह कायम होता.