Sukh mhnje nakki kay asta
मुंबई, 21 जुलै : स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या प्रचंड उलथापालथ झाली आहेत. गौरी शिर्के पाटलांच्या घराची खरी वारसदार आहे हे समजल्यावर त्यांच्या घरातील नात्यांचे अर्थ पूर्णपणे बदललेले दिसत आहेत. या सगळ्याचा परिणाम आता गौरी आणि जयदीपच्या नात्यावरही होत आहे. शिर्के पाटलांच्या घरात कळलेल्या सत्यामुळे येणाऱ्या काळात गौरी आणि जयदीपमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. माई दादांची खरी मुलगी गौरी आहे हे सत्य उघड झाल्यापासून त्यांनी गौरीला सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण बनवले आहे. तेव्हापासून शालिनी गौरीला त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहे. गौरी सध्या ऑफिसमध्ये मालकीण आहे आणि जयदीप तिच्या हाताखाली काम करत आहे. त्यामुळे शालिनी आता जयदीपचं गौरीविरुद्ध मन भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला या प्रयत्नात लवकरच यश येईल असं दिसतंय. कारण मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जयदीप ऑफिसमधून राजीनामा देणार आहे. हेही वाचा - Tejashree Pradhan: सासूने सुनेला दिली फक्कड मेजवानी, शुभ्रा-असावरी पुन्हा एकत्र मराठी टीआरपीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोनुसार, गौरी ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर जयदीपवर उदयला मारण्याचे आरोप लावते. जयदीप तिला सांगतो कि, ‘मी नाही मारलं उदयला, मी फक्त त्याची कॉलर पकडली होती.’ त्यावर गौरी म्हणते , ‘त्यांच्या गालावर मारल्याचे वळ उमटले आहेत, तोंडातून रक्त येत आहे तरी तू मारलं नाही म्हणतो आहेस.’ यावर जयदीप स्वतःचा राजीनामा लिहून गौरीकडे देतो. ‘खरं खोटं न करता तू मला गुन्हेगार मानलंस’ असं म्हणून जयदीप त्याचा राजीनामा लिहून गौरीच्या हातात देतो.
या सगळ्या घटनांवरून जयदीप आणि गौरीच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता यापुढे गौरीचं पुढचं पाऊल काय असेल, ती जयदीपला कसं समजावते, जयदीप खरंच गुन्हेगार आहे का कि हि शालिनीची खेळी आहे हे येणाऱ्या काळात बघणं महत्वाचं ठरणार आहे.