JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sukh Mhanje Nakki Kay Asta : शिर्के-पाटलांच्या घरी येणार नवीन पाहुणा; गौरी देणार गुड न्यूज

Sukh Mhanje Nakki Kay Asta : शिर्के-पाटलांच्या घरी येणार नवीन पाहुणा; गौरी देणार गुड न्यूज

गौरी माई दादांची खरी मुलगी आहे हे सत्य उघड झाल्यापासून शालिनी गौरीला त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहे. पण आता मालिकेत वेगळं वळण येणार आहे जे गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात सुख घेऊन येईल.

जाहिरात

sukh mhnje nkki kay asta

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑगस्ट : स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेला सध्या वेगळंच वळण लागलं आहे.  गौरी शिर्के पाटलांच्या घराची खरी वारसदार आहे हे समजल्यावर त्यांच्या घरात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सगळ्या नात्यांचे अर्थ सध्या बदलले आहेत. जयदीप सध्या स्वतःला शिर्के पाटलांच्या घरात वेगळं समजत आहे. तसेच त्याला शालिनी आणि इतर लोकही तो शिर्के पाटलांचा नाही हे जाणवून देत आहेत.  या सगळ्याचा परिणाम आता गौरी आणि जयदीपच्या नात्यावरही  होत आहे. शिर्के पाटलांच्या घरात कळलेल्या सत्यामुळे येणाऱ्या काळात गौरी आणि जयदीपमध्ये काही काळासाठी  दुरावा निर्माण झाला होता. पण गौरीने परिस्थिती सांभाळून घेत त्यांच्या नात्याची  घडी सावरली. पण आता दोघांमध्ये तिसरा पाहुणा  येणार आहे. सुख म्हणजे काय असतं  मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे येणाऱ्या काळात मालिकेत एक पॉझिटिव्ह ट्रॅक  पाहायला मिळणार आहे. मालिकेत गौरीला दिवस जाणार असून शिर्के पाटलांच्या घरात नवीन सदस्याचे आगमन होणार आहे. मालिकेचा एक प्रोमो  आला  आहे. त्यानुसार गौरी आणि जयदीप शिर्के पाटलांचं घर सोडून जात असतात. मध्येच माई  त्या दोघांना आडवते  आणि त्यांना घर सोडून जाण्यामागचं कारण विचारते. तेवढ्यात गौरी चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा डॉक्टर गौरी गरोदर असल्याचं  सगळ्यांना सांगतात. त्यामुळे शिर्के पाटील कुटुंबीय सध्या आनंदात आहेत. हेही वाचा - Shalva kinjawdekar : शाल्वच्या आयुष्यातील ही जिगीषा नक्की आहे तरी कोण? तिला अभिनेता म्हणतोय ‘माय लव्ह’

संबंधित बातम्या

खरंतर शिर्के पाटलांच्या घरात गौरीचे सत्य समोर आल्यापासून शालिनी जयदीपचा अपमान करण्याचा एकही चान्स सोडत नाही. शालिनीने आता रक्मिणीलाही जयदीप विरुद्ध भडकावलं  आहे. रुक्मिणी  जयदीप अजूनही शिर्के पाटलांच्या घरात का राहतोय म्हणून त्याचा अपमान करते. त्यामुळे जयदीप घर सोडून जात आहे. त्याच्याबरोबर गौरीही निघाली होती. पण आता गौरीने दिलेल्या गुड न्यूज मुळे  येणाऱ्या काळात गौरी आणि जयदीप शिर्के पाटलांच्या घरातच राहणार कि घर सोडून जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सुख म्हणजे काय असतं  मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे मालिका टीआरपी मध्ये एक नंबरला आहे. या मालिकेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.  आता येणाऱ्या काळात मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या