JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शालिनी पोहोचली कोकणात! अभिनेत्रीनं मारला फणसावर ताव, पाहून तोंडाला सुटेल पाणी

शालिनी पोहोचली कोकणात! अभिनेत्रीनं मारला फणसावर ताव, पाहून तोंडाला सुटेल पाणी

माधवीनं गावचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यातील एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जाहिरात

अभिनेत्री माधवी निमकरनं मारला फणसावर ताव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात.  सुट्ट्यांमध्ये गावी जाऊन निवांत बसणं, आंबे, फणस, काजू खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. त्यात तुम्ही कोकणातले असाल तर आंबा, फणस आणि रानमेव्याची चंगळच. कलाकार मंडळी देखील सुट्ट्यांसाठी आपापल्या गावी गेलेत. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील सर्वांची लाडकी शालिनी देखील सुट्ट्या एन्जॉय करतेय. शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर कोकणात पोहोचली आहे. कोकणात जाताच माधवनी आंबा फणसाचा आस्वाद घेण्यासाठी सुरूवात केलीये. माधवीनं फणसावर ताव मारला असून फणस सोलतानाचा खास फोटो तिनं शेअर केलाय. कोकणातील लोक फणसासारखी असताता असं म्हणतात. वरून काटेरी आणि आतून गोड. कोकणात ठिकठिकाणी फणसाची झाडं पाहायला मिळतात. अभिनेत्री माधवी निमकर कोकणातल्या गुहागर जिल्ह्यात गेली आहे. गुहागर हे माधवीचं जन्म ठिकाण आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलाबरोबर माधवी गुहागरला गेलीये. गावी जाताच तिनं गावातील प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली. गुहागरमधील हेदवी येथील गणपती मंदिर आणि वेळणेश्वर येथील शंकाराच्या मंदिराला भेट दिली. हेही वाचा -  ‘आपली संस्कृतीचं ज्ञान पाजळू नका’; लाल बिकिनीतील फोटो शेअर करत मितालीनं लगावला टोला

संबंधित बातम्या

माधवीनं गावचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यातील एका फोटोमध्ये ती पिकलेला फणस सोलताना दिसत आहे. गावच्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर मोठा फणस कापून तो फणस ती निवांत सोलताना दिसत आहे. फणस घायला फार गोड लागतात मात्र ते साफ करणं देखील एक कला आहे असं कोकणातील लोक म्हणतात.

‘नो नीड कॅप्शन’, असं म्हणत माधवीनं फणस सोलतानाचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलंय.  अभिनेत्री स्नेहा रायकरनं ‘मलाही गरे हवेत’ अशी कमेंट केली आहे. त्यावर माधवीनं देखील ‘आणते’ म्हणत हार्ट इमोजी शेअर केलाय. तर एका चाहत्यानं माधवीला, ‘ते हाताला तेल लावा… नाही तर डिंक लागेल’, असा सल्ला देखील दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या