JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सुख म्हणजे..' फेम शालिनी 'शेर शिवराज'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, फर्स्ट लुक आला समोर

'सुख म्हणजे..' फेम शालिनी 'शेर शिवराज'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, फर्स्ट लुक आला समोर

‘सुख म्हणजे नक्की काय असतं..’ या मालिकेत मुख्य खलनायिका साकारणारी ‘शालिनी वहिनी’ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या माधवी नीमकरचं अनेकदा कौतुक झालं आहे. दरम्यान माधवी आता प्रेक्षकांना नव्या भूमिकेत दिसणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanaje Nakki Kay Asta) या स्टार प्रवाहवरील मालिकेतील कलाकार घराघरात पोहोचले आहेत. ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये देखील पहिल्या दहा मालिकांमध्ये असते. दरम्यान या मालिकेत मुख्य खलनायिका साकारणारी ‘शालिनी वहिनी’ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या माधवी नीमकरचं अनेकदा कौतुक झालं आहे. दरम्यान माधवी (Maadhavi Nemkar in Sher Shivraj) आता प्रेक्षकांना नव्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj Release Date) या सिनेमात माधवी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लुक देखील समोर आला आहे. याआधी तिने दिग्पालने दिग्दर्शित केलेल्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवलेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind Movie) सिनेमात भूमिका केली होती. माधवी नीमकर ‘शेर शिवराज’ या सिनेमात ‘मातोश्री सोयराबाई राणीसरकार’ ही भूमिका साकारणार आहे. ‘शेर शिवराज’च्या टीमने आणि स्वत: माधवी नीमकरने तिचा या सिनेमातील फर्स्ट लुक शेअर केला आहे. नाकात नथ, पारंपरिक साज, कपाळावर चंद्रकोर, डोक्यावर पदर इ. अशा लुकमध्ये माधवीचं मराळमोठं सौंदर्य खुलून दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अशी कॅप्शन दिली आहे की, ‘सांभाळू आम्ही आऊसाहेबांना, थोरल्या राणीसाहेबांना, बाळराजेंना आणि सगळ्यांनाच….. शब्द आहे आमचा!’ अगदी मोजक्याच शब्दात कणखर अशा सोयराबाई राणीसरकारांचे व्यक्तीमत्त्व मांडण्यात आले आहे. माधवीने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. शिवाय तिच्या लुकचं कौतुक देखील केलं जात आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मधील माधवीची सहकलाकार अश्विनी कासार हिने देखील या फोटोवर कमेंट करत ‘Wow’ असं म्हटलं आहे. काहींनी माधवीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. माधवी या भूमिकेला नक्की न्याय देईल अशा आशयाच्या कमेंट्स काही चाहत्यांनी केल्या आहेत. माधवी नीमकर हिने आधी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ सिनेमात मातोश्री गौतमाई देशपांडे यांची भूमिका साकारली होती. यामध्ये छोटसं पण लक्ष वेधून घेणारं काम अभिनेत्रीने केलं होतं. आता तिची नवी भूमिका कशी असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. ‘पावनखिंड’च्या घवघवीत यशानंतर आता चाहत्यांना दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj directed by Digpal Lanjekar) या सिनेमाची प्रतीक्षा आहे. या ‘शिवराज अष्टक’ (Shivraj Ashtak Movies) सीरिजमधील आजवरच्या सर्व सिनेमांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. शिवराज अष्टकमधील पावनखिंड हा तिसरा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवरही कमाल केली. याआधी ‘श्री शिवराज अष्टक’ या सीरिजमधील ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या