मुंबई, 24 जुलै : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला (Subodh Bhave)ओळखलं जातं. आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनात उतरवणारे सुबोध भावे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशातच सुबोध भावेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोंनी सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. याशिवाय हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सुबोध भावेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पहायला मिळतंय की, सुबोध भावेंच्या हातात एक स्क्रिप्ट दिसत आहे. आणि त्यांनी फोटोला कॅप्शनही मस्तच दिलंय. कॅप्शननही अनेकांना विचारात पाडलंय. ‘एक जुनं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने…..’, असं फोटो शेअर करत सुबोध भावेंनी म्हटलं आहे. हेही वाचा - Malaika Arora: सतत डाएट फॉलो करणाऱ्या मलायकाने मारला बिर्याणीवर ताव; बनवले चमचमीत पदार्थ सुबोध भावेंच्या या फोटो कॅप्शननं अनेकांची उत्सुकता वाढवली आहे. अनेक कमेंट येताना दिसत आहे. सुबोध भावेच्या या पोस्टला अनेकांनी लाइक्सही दिले आहेत. कोणते स्वप्न असेल ते हे हीजाणून घेण्याची वाट पाहतो आतुरतेने… खुप आनंद आणि भरपुर भरपुर शुभेच्छा, स्वप्न पूर्तीचा आनंद लवकरच संपुष्टात येईल आणि सुदंर कलाकृती घडेल…खूप साऱ्या शुभेच्छा, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
दरम्यान, ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम 29 जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार असून, या कार्यक्रमात महिला कलाकार सहभागी होणार आहेत.