JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ashrunchi Zali Phule: एकदम कडSSक! मराठी नाटकाचा शो परदेशात हाऊसफुल्ल, सुबोध भावेने शेअर केला Photo

Ashrunchi Zali Phule: एकदम कडSSक! मराठी नाटकाचा शो परदेशात हाऊसफुल्ल, सुबोध भावेने शेअर केला Photo

सध्या अभिनेता सुबोध भावे अमेरिकेमध्ये असून तो ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगांनिमित्त व्यग्र आहे. या नाटकाचे परदेशातील विविध शहरात होणारे प्रयोग यशस्वी ठरत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल: मराठी रंगभूमीवरील एका अजरामर कलाकृतीबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave Ashrunchi Zali Phule) याने त्याच्या इन्स्टाग्राम (Subodh Bhave Instagram) पोस्टमधून ही बातमी दिली आहे. सध्या अभिनेता सुबोध भावे अमेरिकेमध्ये असून तो ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगांनिमित्त व्यग्र आहे. या नाटकाचे परदेशातील विविध शहरात होणारे प्रयोग यशस्वी ठरत आहेत. सुबोधने या ‘अश्रुंची झाली फुले’बाबत आणखी एक महत्त्वाचे अपडेट सोशल मीडियावर शेअर केले आहे. सुबोधने शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्टनुसार ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाचा शिकागोमधील प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे. त्यानिमित्त शिकागोवासियांचे आभार मानणारी पोस्ट अभिनेता सुबोध भावे याने केली आहे. अभिनेता सुबोध भावेसह इतरही मराठी कलाकार या नाटकानिमित्त अमेरिका दौऱ्यावर आहेत. सुबोध भावे याने ही पोस्ट शेअर करताना मराठीमध्ये ‘हाऊसफुल्ल’ लिहिलेल्या बोर्डाचा फोटो आणि नाट्यगृहात ही कलाकृती पाहण्यासाठी जमलेल्या दर्दी प्रेक्षकांसह सेल्फी शेअर केला आहे. त्याने अशी पोस्ट केली आहे की, ‘अश्रूंची झाली फुले… शिकागोचा हाऊसफुल्ल प्रयोग! धन्यवाद शिकागोकर’

याआधी देखील सुबोध भावे याने त्याच्या अमेरिकेच्या या टूरमधील फोटो शेअर केले होते. अटलांटामध्ये जेव्हा या नाटकाचा प्रयोग होता तेव्हाही त्याने असाच नाट्यगृहातील प्रेक्षकांसह सेल्फी शेअर केला होता. याशिवाय न्यू जर्सी, वॉशिंग्टनमध्ये देखील या नाटकाचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. हे वाचा- ‘आमची मैत्री राम-लक्ष्मणासारखी राहावी’, Bigg Boss Marathi फेम विकास-विशालचा Photo Viral ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाचा दौरा 1 एप्रिल ते 1 मे असा असणार आहे. या दरम्यान विविध शहरात नाटकाचे प्रयोग होणार आहेत. प्रयोगादरम्यानच्या कालावधीत हे कलाकार सुट्टी देखील एंजॉय करताना दिसत आहेत. सुबोधसह या कलाकारांनी देखील या यूएस टूरचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या