JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / वरुण धवनच्या घरात घडत आहेत विचित्र घटना, VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का

वरुण धवनच्या घरात घडत आहेत विचित्र घटना, VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का

आम्ही येथे वरुण धवनबद्दल (Varun Dhawan) बोलत आहोत. सर्वानांच माहिती आहे की, वरुण धवनला सायन्स फिक्शन शोचं वेड आहे. पण, आता त्याचा परिणाम त्याच्या घरातही दिसू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,17 मे-   सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वेबसीरिजची चांगलीच हवा आहे. अनेक वेबसीरिजनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. दरम्यान ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ या  (Stranger Things 4)  अमेरिकन हॉरर सीरिजच्या चौथ्या सीजनची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. तत्पूर्वीच बॉलिवूडमध्ये जणू काही विचित्र गोष्टी घडू लागल्या आहेत. आम्ही येथे वरुण धवनबद्दल (Varun Dhawan) बोलत आहोत. सर्वानांच माहिती आहे की, वरुण धवनला सायन्स फिक्शन शोचं वेड आहे. पण, आता त्याचा परिणाम त्याच्या घरातही दिसू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. नुकतंच वरुण धवनने सोशल मीडियावर त्याच्या घराची झलक दाखवली. हा व्हिडिओ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे ज्यामध्ये वरुण धवन आपल्या घरात फेरफटका मारताना दिसत आहे. या दरम्यान कलाकार त्याची भीतीदायक बाजूदेखील दाखवत आहे. तसेच भिंतीवर हॉरर अशा वॉल हँगदेखील दिसत आहेत. जेव्हा वरुण धवनला विचारले जाते तेव्हा तो त्याच्या आवडत्या सीरिजबद्दल आणि त्यातील आयकॉनिक व्यक्तिरेखेबद्दल सांगतो. व्हिडिओ जसजसा पुढे जातो घरामध्ये तसतशा आणखी विचित्र गोष्टी घडू लागतात. या व्हिडीओमध्ये वरूण धवनच्या घरात भीतीदायक गोष्टी घडत असल्याचं दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

वरुण धवनच्या या घरातील व्हिडिओमध्ये आणखी बरंच काही पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये वरुण धवन कधी भीतीदायक तर कधी नॉर्मल फॉर्ममध्ये दिसत आहे. तुम्ही आणखी गोंधळून जाण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की नेटफ्लिक्सने ‘स्ट्रेंजर थिंग्ज’च्या प्रमोशनसाठी वरुण धवनला कास्ट केलं आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्ज 4’चं वरुण धवनने आगळ्यावेगळ्या स्टाईलने प्रमोशन केलं आहे. जे नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर करण्यात आलं आहे. वरुण धवनचा हा प्रमोशनल व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.ही अमेरिकन सीरिज येत्या १ जुलैला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या