JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Yasharaj Mukhate : संजना भारीचये! अरुंधतीपेक्षा तिला जास्त सेन्स आहे; यशराज मुखाटेच्या आईकडून संजनाचं कौतुक

Yasharaj Mukhate : संजना भारीचये! अरुंधतीपेक्षा तिला जास्त सेन्स आहे; यशराज मुखाटेच्या आईकडून संजनाचं कौतुक

यशराज मुखाटेने त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या आईचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची आई ‘मन उडू उडू झालं’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांबद्दल त्याला सांगत आहे. त्याची आई या दोन्ही मालिकांमध्ये सध्या काय चालू आहे, मालिकेत कुठले ट्विस्ट आले आहेत तसेच या मालिकेतील भूमिकांबद्दल बोलतानाही दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : यशराज मुखाटे कोणाला माहिती नाही असं होणार नाही. ‘रसोडे मे कौन था’ या त्याच्या म्युझिक व्हिडीओने तर  सर्व आबालवृद्धांना वेड लावलं होतं. तो वेगवेगळ्या डायलॉगचे रिमिक्स करून त्याचा व्हिडीओ शेअर करतो. ते त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आता या सोशल मीडिया स्टार यशराजने एक नवा व्हिडिओ शेअर केला  आहे. या व्हिडिओमध्ये त्याची आई चक्क मराठी मालिकांबद्दल त्याला अपडेट देत आहे. यशराज मुखाटेने त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या आईचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची आई ‘मन उडू उडू झालं’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांबद्दल त्याला सांगत आहे. त्याची आई या दोन्ही  मालिकांमध्ये सध्या काय चालू आहे, मालिकेत कुठले ट्विस्ट आले आहेत तसेच या मालिकेतील भूमिकांबद्दल बोलतानाही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये यशराजची आई ‘आई कुठे काय करते’ मालिकेबाबत बोलताना अरुंधती सोडून चक्क खलनायिका असलेल्या संजनाचं कौतुक करतेय. तसेच संजना मालिकेत खलनायिकेची भूमिका करत असली तरी त्याची आई म्हणतेय की, ‘संजना आधीपासूनच चांगलीये. अरुंधतीपेक्षा संजनाला जास्त सेन्स आहे, तिला जास्त कळतं असं ती म्हणतेय’. तसेच यशराजची आई मालिकेत सध्या सुरू असलेल्या ट्रॅक बद्दलसुद्धा  त्याला अपडेट्स  सांगत आहे. हेही वाचा - Sandeep Pathak: ‘म्हणून अधून मधून इन्स्टाग्रावर पोस्ट टाकत असतो’; संदीप पाठकनं सांगितलं कारण

संबंधित बातम्या

तसेच त्याच्या या पोस्टखाली संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिने यशराजचे आभार मानत ‘आईला खूप खूप प्रेम’ अशी कमेंट केली आहे. तसेच यशराजची आई त्याला झी मराठीवरील  ‘मन उडू उडू झालं’  मालिकेत सध्या काय चालू आहे, तसेच काय व्हायला पाहिजे याविषयी सुद्धा सांगत आहे. यशराज मुखाटेने त्याच्या इन्स्टाग्रामवरून त्याच्या आईचे हे व्हिडीओ शेअर करत, ‘आमची मराठी मालिकांबद्दल चर्चा चालली आहे. ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्याबद्दल आता मला वाईट वाटतंय. त्यांना आम्ही काय बोलत आहोत हे कळलं असत तर मजा आली असती.’ असं तो म्हणतोय. तसच ‘आमचं आयुष्य या मालिकांवर अवलंबून असल्यासारखी आम्ही त्याची चर्चा करतोय’ असंही त्याने लिहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या