आरआरआर
मुंबई, 25 फेब्रुवारी: एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला भारतासोबतच विदेशातील प्रेक्षकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर रेकॉर्डब्रेक कमाई तर केलीच पण अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची देखील कमाई केली. 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात चित्रपटाने एक नवीन विक्रम केला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून इतिहास रचला. तर आता चित्रपट ऑस्कर 2023 च्या शर्यतीत आहे. त्यापूर्वी या चित्रपटाबद्दल अजून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट रोज नवनवीन यश मिळवत आहे. या चित्रपटाला ऑस्करची प्रतीक्षा असताना आता त्यापूर्वी या चित्रपटाने अजून एक आंतराष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. RRR ने हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स जिंकले आहेत. या चित्रपटाने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तीन पुरस्कार पटकावले आहेत. Urfi Javed: उर्फी जावेदचा कुटुंबीयांविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाली ‘वडील रोज मारायचे…’ एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने देशाची मान उंचावत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRR ने तीन श्रेणींमध्ये विजेतेपद पटकावले. 12 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारापूर्वी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर आरआरआरने तीन पुरस्कार आपल्या नावावर करून मोठा विजय मिळवला आहे. हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये RRR ने सर्वोत्कृष्ट अॅक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट स्टंट आणि सर्वोत्कृष्ट गाणे (नाटू नाटू ) हे पुरस्कार जिंकले. चित्रपटाचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित RRR साठी ऑस्कर 2023 च्या आधी ही एक मोठी उपलब्धी आहे. नातू नातूला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे.
आरआरआर या सिनेमाचं दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केलं आहे. तर नाटू नाटू या गाण्याचे शब्द चंद्रबोस यांनी लिहिले आहेत. तसंच गाण्याला म्युझिक एमएम किरावनी यांनी दिलं आहे. सिनेमात अभिनेता राम चरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण, श्रिया सरण हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 2022मध्ये रिलीज झालेल्या आरआरआर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली. 1200 करोडहून अधिक रुपये कमावले. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला तर अनेक पुरस्कारांची कमाई देखील केली आहे.आता हा चित्रपट भारताला ऑस्कर मिळवून देणार का यांच्याकडेच सगळ्यांचे डोळे आहेत.