मुंबई 12 जून: मराठीतील एक अभ्यासू आणि गुणी अभिनेत्री अर्थात (Spruha Joshi) स्पृहा जोशी. स्पृहा जेवढी हुशार अभिनेत्री आहे तितकीच एक गोड व्यक्ती आहे. स्पृहा आणि तिचा नवरा फारसे कधी मुलाखतीत एकत्र जात नाहीत. पण त्यांची (Spruha Joshi Lovestory) लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला माहित आहे का? स्पृहाला लग्नाआधी तिचा नवरा अजिबात आवडला नव्हता. तरी या जोडीचं लग्न कसं झालं? अनुरूप विवाह संस्थेच्या एका कार्यक्रमात स्पृहा जोशी आणि तिचा नवरा वरद लघाटे (Spruha Joshi Varad Laghate) जोडीने पहिल्यांदा उपस्थित होते. या जोडीचा एकत्र असा पहिलाच इंटरव्यू होता. मराठीतील इतर जोडप्यांप्रमाणे स्पृहा आणि वरद यांची लव्हस्टोरी काही जगजाहीर नाही. मग हे कपल नक्की कुठे आणि कसं भेटलं? आणि स्पृहा आणि वरद यांची एकमकेकांविषयी कशी मतं होती हे त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. स्पृहा आणि वरद कॉलेजमध्ये असताना एका वृत्तपत्राचे कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करायचे तिथे त्यांची ओळख झाली. सुरुवातीला त्या दोघांची एकमेकांबद्दलची मतं फार बरी नव्हती.यावर स्पृहा असं सांगते, “माझं वरद बद्दलचं पहिलं इम्प्रेशन फारच वाईट होतं. मला तो अजिबात आवडला नव्हता. त्याला बातम्या दाखवणं, विषय सांगणं हे मला पटायचं नाही. वरदला सुद्धा स्पृहा एक वशिला लावून झालेली कॉलेज प्रतिनिधी वाटायची. असं असताना सुद्धा त्यांचं प्रेम कसं जमलं?
“एका प्रोजेक्टवर आम्हाला जबरदस्तीने काम करावं लागलं ज्यात मी आणि तो मिळून दोन महत्त्वाचे विभाग सांभाळत होतो. तेव्हा आमची जास्त मैत्री झाली. आम्हाला डेट करायला लागल्यावर सुरवातीलाच असं लक्षात आलं की आमचं हे नातं लग्नापर्यंत टिकेल. आम्ही दोघेही गांभीर्याने नात्याकडे बघणारी दोन लोकं होतो. पण आमच्या लव्हस्टोरीमध्ये कोणी कोणाला रोमँटिक प्रपोज केलं नाही. आम्ही एकमेकांना वेळ दिला, नात्यासाठी वेळ घेतला. सगळं बऱ्यापैकी स्वच्छ दिसत होतं. त्यामुळे आम्ही mutually लग्नाचा निर्णय घेतला” आज स्पृहा आणि वरद जवळपास तेरा वर्ष एकत्र आहेत. त्यांनी 2014 मध्ये विवाह केला. त्यांनी अनेक टप्प्यातून स्वतःला आणि त्यांच्या नात्याला जाताना पाहिलं आहे. या इंडस्ट्रीत अनेकांचं लग्न टिकत नाही त्याच इंडस्ट्रीत त्यांच्या नात्याचं उदाहरण दिलं पाहिजे. ते की एकमेकांना स्वतःचे चांगले मित्र मानतात आणि एकमेकांशी सगळं शेअर करायला महत्त्व देतात. हे ही वाचा- कामाच्या बाबतीत सांगयच तर स्पृहा आणि वरद कायम एकमेकांना त्यांच्या कामाची स्पेस देतात. एकमेकांच्या कामाबद्दल ते कायम feedback देतात. सध्या स्पृहा स्वतःच्या युट्युब चॅनेलवर काम करत आहे. तिने नुकताच 100k स्बस्क्रायबर्सचा पल्ला गाठला आहे.