मुंबई 12 ऑगस्ट: सध्या बॉलिवूडमध्ये सिनेमांचं गणित बिनसताना दिसत आहे तर बॉलिवूडवर टॉलिवूड भारी पडतंय का अशी परिस्थिती निर्माण होत आहे. एकीकडे बॉलिवूडचे बडे स्टार सुद्धा प्रेक्षकांना सिनेमागृहात आणायला यशस्वी होत नाहीयेत तिथे साऊथचे स्टार मात्र भाव खाऊन जात आहेत. तरुणाईच्या मनावर राज्य करणारा एक साऊथ हिरो विजय देवरकोंडा लवकरच लायगर नावाच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तुम्हाला माहित आहे का या सिनेमासाठी विजयने किती कोटी रुपये आकारले? विजय देवरकोंडा हा अभिनेता साऊथ नव्हे तर अवघ्या देशभरातील तरुणींचा क्रश आहे. नुसतेच लूक्स आणि बॉडी नाही तर विजयचा अभिनय सुद्धा दुपटीने सरस आहे. सध्या हा अभिनेता अनेक फिल्ममेकरच्या यादीत आहे. त्याच्या लायगर सिनेमासाठी त्याने नेमके किती पैसे आकारले याबद्दल माहिती समोर येत आहे. या सिनेमासाठी त्याने थोडे थोडके नव्हे तर चक्क 35 कोटी रुपये आकारले असं सांगण्यात येत आहे. सिनेमाची हिरोईन अनन्या पांडे हिने सिनेमासाठी 3 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये बॉक्सिंग लेजंड माईक टायसन यांचा पाहुणा कलाकार म्हणून महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यांना सिनेमात घेण्यासाठी सुद्धा चिक्कार पैसे मोजावे लागल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय सिनेमाच्या कास्टमध्ये असणारे रोनित रॉय आणि रम्या कृष्णन यांनी एक कोटी रुपये आकारल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या लायगर या सिनेमाची खूप चर्चा होताना दिसत आहे. सिनेमाचं पोस्टर आणि एकूण लुक फारच लक्षवेधी आहे. सिनेमाचं कथानक सुद्धा हटके आहे असा पोस्टरवरून अंदाज बांधला जात आहे. सध्या विजय आणि अनन्या सिनेमाचं तुफान प्रमोशन करताना दिसत आहेत. यामध्ये विजयने चप्पल घालूं केलेलं प्रमोशन हा अजून एक लक्षवेधी भाग ठरला होता. या सिनेमासाठी विजय कंबर कसून प्रमोशन करताना दिसत आहे. अगदी मोठमोठ्या इव्हेंट पासून फॅन मीटपर्यंत विजय सगळीकडे उत्सहात प्रमोशन करताना दिसत आहे. तसंच काही सोशल मीडिया influencer सोबतही त्याने सिनेमाचं प्रमोशन करत एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.