JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Suraj Kumar : धक्कादायक! 24वर्षीय अभिनेत्याने रस्ते अपघातात गमावला पाय; आता कशी आहे प्रकृती?

Suraj Kumar : धक्कादायक! 24वर्षीय अभिनेत्याने रस्ते अपघातात गमावला पाय; आता कशी आहे प्रकृती?

रस्ते अपघातात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याला रस्ते अपघातात आपला पाय गमावण्याची वेळी आली आहे.

जाहिरात

अभिनेता सूरज कुमारने रस्ते अपघातात गमावला पाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : प्रसिद्ध साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याचा सेटवर अपघात होऊन त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. ही माहिती ताजी असताना आता अभिनेता सूरज कुमार उर्फ ध्रुवनचा भीषण अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की यात अभिनेत्यानं त्याचा एक पाय गमावला आहे.  शनिवारी म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या पायाची सर्जरी केली. पण ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना त्याचा पाय कापावा लागला. अभिनेता सूरज्या या भयकंर अपघाताच्या माहितीनंतर त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सर्वांनी सूरजसाठी प्रार्थना केली आहे. अभिनेता सूरज हा केवळ 24 वर्षांचा आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी त्यानं त्याचं नाव बदलून ध्रुवन असं केलं. 2019मध्ये त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.  सूरज 25 जून रोजी संध्याकाळी उटीवरून म्हैसूरला जात होता. सूरजला बाईक चालवण्याची भयंकर आवड होती. त्याच्या स्वत:च्या बाईकनं तो म्हैसूरला निघाला. प्रवासादरम्यान एका ट्रॅक्टरला ओव्हर टेक करताना त्याचा अपघात झाला. त्याच्या बाईकवरून कंट्रोल सुटल्यानं हा भीषण अपघात झाला. अपघातात सूरज एका लॉरीला जाऊन आपटला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर पहाटे 4 वाजता सूरजला म्हैसूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा कापला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. ( बातमी अपडेट होत आहे )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या