JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सिंघम'-'सिंबा'नंतर आता 'सूर्यवंशी'ची एंट्री; पाहा धमाकेदार VIDEO

'सिंघम'-'सिंबा'नंतर आता 'सूर्यवंशी'ची एंट्री; पाहा धमाकेदार VIDEO

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित सिनेमा ‘सूर्यवंशी’चा एक व्हिडीओ रिलीज झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 डिसेंबर : आगामी 2020 हे वर्ष अनेक अभिनेत्यांसाठी खूप खास असणार आहे. सिंबा सिनेमाला रिलीज होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित सिनेमा सूर्यवंशीचा एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला. या व्हिडीओमध्ये सिंबा रणवीर सिंह आणि सिंघम अजय देवगण सुद्धा दिसत आहेत. व्हिडीओची सुरुवात अजय देवगणच्या डायलॉगनं होते. त्यानंतर सिंबा सिनेमातील काही दृश्य दाखवली जातात. या व्हिडीओमध्ये सिंघमपासून सुरू झालेली कथा सिंबा पर्यंत पोहचली आणि आता ती अक्षय कुमारशी जोडला जाणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या तिन्ही सिनेमांचा एकमेकांशी संबंध पाहायला मिळणार आहे. VIDEO : काका-मामानंतर आता सलमान खानला व्हायचंय ‘बाबा’, स्वतःच केला खुलासा

‘सूर्यवंशी’च्या या 55 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये अजय, अक्षय आणि रणवीर एकत्र खलनायकांशी लढताना दिसत आहेत. पोलिसांच्या वर्दीत हे दोघंही खूपच दमदार लुकमध्ये दिसत आहेत. सूर्यवंशी सिनेमाचा निर्मिती करण जोहरची आहे. तर दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. रोहित शेट्टीनं या अगोदर कबुल केलं आहे की तो मर्व्हलच्या सुपरहिरो सीरिजसारखी सुपर कॉप्स सीरिज तयार करणार आहे. NETFLIX वादाच्या भोवऱ्यात, येशू ख्रिस्तांना समलैंगिक म्हटल्यानं संताप अनावर याआधी ऑक्टोबरमध्ये सूर्यवंशी सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. ज्यात अक्षय, अजय आणि रणवीर एकत्र दिसले होते. सूर्यवंशीमध्ये अक्षय आणि कतरिना यांच्या व्यतिरिक्त गुलशन ग्रोव्हर आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. हा सिनेमा मार्च 2020 मध्ये रिलीज होणार आहे. कुशल पंजाबी आत्महत्या : ‘तू माझा मुलगा…’, मित्राचा हात पकडून ढसाढसा रडली आई

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या