JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी मुलगा आणि कानडी मुलगी दाखवणार भाषेपलीकडचं प्रेम, सोनी मराठीवर लवकरच भेटीला येतेय नवी मालिका

मराठी मुलगा आणि कानडी मुलगी दाखवणार भाषेपलीकडचं प्रेम, सोनी मराठीवर लवकरच भेटीला येतेय नवी मालिका

वेगवेगळ्या संस्कृती एका छताखाली राहणार म्हणल्यावर त्यांच्यात वाद तर होणार हे साहजिक आहे. पण या वादातून फुलणारं प्रेम आणि या प्रेमाची भाषेपलीकडची गोष्ट दाखवायला एक खास मालिका सोनी मराठीवर जुलै महिन्यात येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 29 जून: सोनी मराठीवर (Sony Marathi) सध्या एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज होताना दिसत आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ (Jeevachi Hotiya Kahili) ही एक आगळी वेगळी मालिका सगळ्यांच्या भेटीला 18 जुलै पासून येणार आहे. भाषेपलीकडची प्रीती असा विषय असणारी ही एक अप्रतिम लव्हस्टोरी आहे असं याच्या पहिल्या प्रोमोमधून समजत होतं. आता या मालिकेचं कथानक काहीसं स्पष्ट करणारा दुसरा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. दोन भाषा आणि संस्कृती एकत्र आल्या की काही प्रमाणात भांड्याला भांडं लागतचं. असंच मराठी आणि कानडी भाषेतलं हे गोड भांडण आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या नव्या प्रोमोमध्ये मालिकेतील हिरो आणि हिरोईन एकाच वाड्यात प्रवेश करताना दिसत आहेत. आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होताना दिसत आहेत. कर्नाटकात राहून आमच्यावरच दादागिरी करता असं वाक्य या प्रोमोमध्ये ऐकू येत असल्याने महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर हे कथानक घडत असावं अशी शंका येत आहे. तसंच प्रोमोच्या शेवटी एकमेकांच्या मतभेदांमुळे दोन्हीही कुटुंबातील पुरुष एकाच घरात बॉर्डर आखायला सांगतात. एकाच घरात भाषा, संस्कृती यावरून होणारे हे मतभेद आणि त्यात रंगणारी ही प्रेमकथा बघायला नक्कीच मजा येणार एवढं नक्की.

संबंधित बातम्या

यामध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला राज हंचनाळे या एका रांगड्या मराठी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रतीक्षा शिवणकर ही एका गोड पण खोडकर अशा कानडी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हे ही वाचा-  BBM फेम मीरा जग्गनाथ बनणार शेफ; कुकिंग शोमध्ये लावणार हजेरी याशिवाय या प्रोमोमध्ये दोनही कुटुंबातील इतरही पात्रांची ओळख होते. अतुल काळे, सीमा देशमुख, विद्याधर जोशी, भारती पाटील असे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. या प्रोमोच्या शेवटी घरचे दोन हिस्से करताना एक खास संवाद मुलामुलींमध्ये होतो. त्यातून त्यांचं गहिरं प्रेम आणि एकमेकांशी लग्न करायची इच्छा सुद्धा समजते. आता कानडी मुलगी आणि मराठी मुलगा यांचं हे भाषेपलीकडचं प्रेम नेमकं घरच्यांना पसंत पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या तरी प्रेक्षकांना या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण होताना दिसतेय. याचा प्रोमो सुद्धा बराच छान पद्धतीने तयार केला असल्याने या सुंदर लव्हस्टोरीबद्दल चर्चा होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या