JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मुलगा 6 महिन्याचा होताच सोनमने शेअर केला वायुचा गोंडस फोटो, चाहत्यांसह सेलेब्सकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

मुलगा 6 महिन्याचा होताच सोनमने शेअर केला वायुचा गोंडस फोटो, चाहत्यांसह सेलेब्सकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

आज 20 फेब्रुवारीला सोनमचा मुलगा वायु सहा महिन्याचा झाला आहे. यानिमित्तच सोनमने तिच्या मुलाची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर मागच्या काही दिवसांपासून मुलगा ‘वायु’ (Vayu) च्या संगोपणात व्यस्थ आहे. सोनम सध्या तिच्या आईपणाचा आनंद घेत आहे. आज 20 फेब्रुवारीला सोनमचा मुलगा वायु सहा महिन्याचा झाला आहे. यानिमित्तच सोनमने तिच्या मुलाची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोनमने मुलाचा फोटो शेअर करत मुालावरील प्रेम व्यक्त केलं आहे सोनम कपूरने आनंद आहूजासोबत 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर 20 ऑगस्टला तिनं मुलाला जन्म दिला. सोनल सोशल मीडियावर नेहमी मुलाचे फोटो शेअर करत असते. मुलाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर सोनमने आज मुलाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत वायु सोनमच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. वाचा- ‘नोटा घ्या.. नोटा द्या..’, का म्हणतेय भार्गवी चिरमुले? काय आहे हा नेमका प्रकार? सोनमने या फोटोत पिवळ्या रंगाचा लाईनिंचा नाईट ड्रेस घातलेला दिसत आहे. तिच्या मांडीवर मुलगा वायु बसलेला दिसत आहे. हा फोटो वरून काढलेला दिसत आहे. त्यामुळे या फोटोत सोनमच्या मुलाचा चेहरा दिसत नाही. वायु मात्र आईच्या मांडीवर बसून मस्त बॉलने खेळताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

सोनमने मुलाचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, वायु सहा महिन्याचा झाला. हे जगातील सर्वात सुंदर काम आहे. मला मिळालेल्या जगातील सर्वात सुंदर आशीर्वाद आहे. मी तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते. मी आणि तुझे बाबा याहून जास्त काहीच मागू शकत नाही.

यासोबतच सोनमने वायुचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये वायु पांढऱ्या रंगाच्या कुर्ता घातलेला दिसत आहे. वायु पालता पढलेला दिसत आहे. वायु जवळ खेळणी दिसत आहे. सोनमने आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांसह सेलेब्सनी देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोनी राजदानपासून भावन पांडे यांनी हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या