मुंबई,16 जून- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची लेक (Anil Kapoor Daughter) सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. सध्या सोनम पती आनंद अहुजासोबत (Anand Ahuja) लंडनमध्ये आहे. याठिकाणी ती आपली प्रेग्नेसी एन्जॉय करत आहे. दरम्यान, आता लंडनमध्ये सोनमचा बेबी शॉवर (Baby Shower) फंक्शन पार पडला. सोनमने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बेबी शॉवरचे अनसीन फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच तिची बहीण रिया कपूरनेही तिच्या इन्स्टाग्रामवर सोनमच्या बेबी शॉवरची झलक दाखवली आहे. अभिनेत्री सोनम कपूर सध्या विदेशात वास्तव्यास असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भारतीय चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती सतत इन्स्टाग्रामवरुन आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या अपडेट्स देत असते. दरम्यान आपली पहिली प्रेग्नेन्सी त्यात येत असलेले विविध अनुभव ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सोबतच अभिनेत्री सतत बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट करत आहे. आता अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे फोटो शोषलं मीडियावर व्हायरल होत आहेत.
रिया कपूरने बहीण सोनमला टॅग करत लिहिलंय. “तो खूप सुंदर बेबी शॉवर होता”. तसेच रियाने आपल्या इन्स्टा स्टोरीद्वारे चाहत्यांना बहिणीच्या बेबी शॉवरची खास झलक दाखवली आहे. सोबतच सोनमच्या बेबी शॉवरमध्ये सहभागी झालेल्या लिओ कल्याण नावाच्या कलाकारानेही या फंक्शनमधील फोटो आणि व्हिडिओही आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. जेसध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
रिया आणि सोनम कपूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये फोटो आणि व्हिडिओद्वारे बेबी शॉवरचं प्लनिंग आणि डेकोरेशन याबद्दल सांगितलं आहे. या फोटोंमध्ये बेबी शॉवरसाठी सुंदर सजावट, फुले, चीज केक आणि बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. या फंक्शनसाठी सोनम कपूरने पिंक कलरचा इंडो वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता. तसेच अभिनेत्री आपल्या ‘दिल्ली ६’ मधील मस्सकली या गाण्यावर एन्जॉय करताना दिसली.