मुंबई 29 जून: अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या फुल्ल फॉर्मात आहे. संतोष जुवेकरने कायमच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. झेंडा, मोरया अशा सुपरहिट चित्रपटातून संतोष प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाला होता. आता संतोषने एक खास अपडेट शेअर केला आहे. संतोषच्या नव्या फिल्मचं नुकतंच शूटिंग संपलं आहे अशी माहिती त्याने दिली आहे. संतोष सध्या प्रचंड आनंदात आहे. आणि त्याच्या आनंदाचं कारण आहे त्याची नवी फिल्म. संतोष त्याच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. ‘मिराज’ असं या फिल्मचं नाव असून त्या (Santosh Juvekar upcoming marathi film) फिल्मचं नुकतंच शूटिंग रॅप झालं आहे.शूटिंग संपल्याच्या आणि चित्रपट यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या आनंदात संतोषने एक खास पोस्ट शेअर करत टीमचे आभार मानले आहेत. तो या पोस्टमध्ये असं लिहितो, “One more feather in my cap अजून एक सुंदर सिनेमा करण्याची संधी मिळाली, shoot झालं.काल गणपती बाप्पा मोरया केलं सगळ्यांनी समाधानन आणि आनंदान thank u Director Pratik Moitro DOP Sulabh Bangale and whole ptoduction team and direction team, camera team, spot भाय लोग, light भाय लोग, driver भाय लोग, and very important आपले जेवण बनवून खाऊ घालणारे भाय लोग. उत्तम जेवण मिळालं की काम पण दणक्यात होतंय भावा. And thank u #nagpurkar मज्जा आली खूप काळा नंतर नागपुरात shooting केलं जाम भारी वाटून राहिलंना भाऊ, कशली भारी development झाली आहेना बे नागपूरची मज्जाच येऊन राहिलीनाबे shooting कराले ❤❤
या पोस्टमधून असं कळत की संतोष बऱ्याच काळानंतर नागपूर मध्ये शूटिंग करायला आला होता आणि त्याने नागपूरचा पुरेपूर आनंद लुटला. त्याने या पोस्टमध्ये दिग्दर्शक, छायाचित्रकार यांच्यापासून अगदी स्पॉट दादांपर्यंत प्रत्येकाचे आभार मानले आहेत. सेटवर खाऊ घालणाऱ्या टीमला, ड्रायव्हर दादांना सुद्धा तो धन्यवाद द्यायला विसरला नाही. हे ही वाचा- मराठी मुलगा आणि कानडी मुलगी दाखवणार भाषेपलीकडचं प्रेम, सोनी मराठीवर लवकरच भेटीला येतेय नवी मालिका
संतोष हा इन्स्टाग्रामवर प्रचंड ऍक्टिव्ह (Santosh Juvekar instagram) असतो. त्याचे धमाल रील्स बघायला चाहत्यांना मजा येते. तसंच मागच्या काही काळात त्याने अनेक मराठी कलाकृतींबद्दल भरभरून कौतुक करून पाठिंबा सुद्धा दर्शवला होता. संतोषने त्याच्या फिल्मबद्दलच्या पोस्टमधून त्याच्या नव्या कामाचे संकेत सुद्धा दिले आहेत. कामाच्या बाबतीत प्रचंड चोख असणारा संतोष येत्या काळात कोणत्या कलाकृतीत दिसणार हे पाहून आता महत्त्वाचं असेल.