JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दोन मास्टर माइंड अन् रूप सुंदरीची Bigg Boss Marathi 4मध्ये एंट्री; कोण देणार कोणाला काय सल्ला?

दोन मास्टर माइंड अन् रूप सुंदरीची Bigg Boss Marathi 4मध्ये एंट्री; कोण देणार कोणाला काय सल्ला?

आता शेवटच्या आठवड्यात स्पर्धकांना आणखी चिअर अप करण्यासाठी बिग बॉसच्या आधीच्या सीझनचे काही स्पर्धक घरात येणार आहेत.

जाहिरात

बिग बॉस मराठी 4

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर: बिग बॉस मराठी 4 प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.  येत्या 8 जानेवारीला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार असून बिग बॉसचा चौथा विनर प्रेक्षकांना मिळणार आहे. जसे जसे 100 दिवस पूर्ण होऊ लागलेत तस तशी उत्सुकता वाढली आहे. मागच्या आठवड्यातच फॅमिली विक झाला.  सगळ्या सदस्यांचे कुटुंबिय घरात आले होते. त्यांच्या येण्यानं सगळ्या स्पर्धकांना नवी उर्जा मिळाली. आता शेवटच्या आठवड्यात स्पर्धकांना आणखी चिअर अप करण्यासाठी बिग बॉसच्या आधीच्या सीझनचे काही स्पर्धक घरात येणार आहेत.  स्मिता गोंदकर, नेहा शितोळे, उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे. बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्यात घरातून आतापर्यंत आऊट झालेले स्पर्धक पुन्हा एकदा घरात येतात. पहिल्या दिवशी घरात असलेले स्पर्धक शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळतात. घरातून बाहेर गेलेली तेजस्विनी लोणारी पुन्हा घरात येणार आहे. तेजूला पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. तेजस्विनी देखील टॉप 5मधली स्पर्धक होती मात्र हाताच्या दुखण्यामुळे तेजस्विनीला बाहेर जावं लागलं. पण तिला काही तासांसाठी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली. हेही वाचा - Tejaswini Lonari: सर्वांची लाडकी तेजू पुन्हा घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री; चाहते म्हणाले… त्यानंतर आता बिग बॉसमध्ये अभिनेत्री नेहा शितोळे, स्मिता गोंदकर आणि उत्कर्ष शिंदे यांची एंट्री होणार आहे. तिघांच्या ग्रँड एंट्रीचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री स्मिता गोंदकर पहिल्या सीझनची स्पर्धक होती. स्मिता टॉप 6पर्यंत आली होती. त्यानंतर अभिनेत्री नेहा शितोळे बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनची मास्टर माइंड म्हणून ओळखली गेली. नेहा शिव ठाकरेबरोबर टॉप 2पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर तिसऱ्या सीझनचा मास्टर माइंड डॉ. उत्कर्ष शिंदे आणि टीमनं सीझन गाजवला.  या तिघांनी त्यांच्या सीझनला चार चांद लावले होते. तिघांना पुन्हा एकत्र पाहून चाहते भलतेच खुश झालेत.

बिग बॉस मराठी  4 चा विजेता कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत आणि आरोह वेलणकर हे सदस्य आता घरात आहेत. यातील एक सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाईल त्यानंतर टॉप 6स्पर्धकांमधून बिग बॉस मराठी 4चा विजेता प्रेक्षकांना मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या