JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Singham Again: आता होणार राडा! अजय देवगणच्या 'सिंघम'मध्ये 'सूर्यवंशी' घेणार एंट्री

Singham Again: आता होणार राडा! अजय देवगणच्या 'सिंघम'मध्ये 'सूर्यवंशी' घेणार एंट्री

रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटाच्या पुढच्या भागाविषयी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

जाहिरात

सिंघम अगेन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जानेवारी:  ‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे सुपरहिट कॉप ड्रामा चित्रपट देणारा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आता त्याचा पुढचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ घेऊन परतणार आहे. अजय देवगणच्या सिंघमचा हा तिसरा भाग असणार आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा कडक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण लेडी सिंघम च्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. ‘सिंघम अगेन’ ची घोषणा झाल्यापासून, या चित्रपटात रणवीर सिंग सिम्बाच्या भूमिकेत आणि अक्षय कुमार सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार असल्याचा अंदाज बांधला  जात होता. आता रिपोर्ट्सनुसार, हे प्रत्यक्षात घडणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग दोघेही अजय देवगण आणि दीपिका पदुकोण च्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की ‘सिंघम अगेन’मध्ये कॉप युनिव्हर्समधील इतर कलाकारांचा कॅमिओ असेल. ज्याप्रमाणे अजय देवगणने ‘सिम्बा’मध्ये सिंघम म्हणून तर रणवीर आणि अजय या दोघांनी सूर्यवंशी मध्ये  कॅमिओ केला होता त्याचप्रमाणे आता अक्षय कुमार अजय देवगणच्या ‘सिंघम’मध्ये सूर्यवंशी म्हणून कॅमिओ करणार आहे. हेही वाचा - Sooryavansham: टीव्हीवर सारखा ‘सूर्यवंशम’ पाहून वैतागलेल्या प्रेक्षकाने थेट उचललं असं पाऊल; सगळीकडे होतेय चर्चा विशेष म्हणजे या चित्रपटांच्या कथा एकमेकांशी जोडलेल्या असतील अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे बॉलिवूडचे हे तिन्ही सुपरस्टार्स चित्रपटात आपापल्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, रोहित शेट्टी मार्वल युनिव्हर्सच्या धर्तीवर कॉप युनिव्हर्स चित्रपट बनवत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर, ‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगणसोबत अक्षय कुमारला सूर्यवंशी आणि रणवीर सिंगला सिम्बाच्या भूमिकेत पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच असेल.

‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगण इन्स्पेक्टर बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच लेडी कॉपची भूमिका साकारताना दिसणार आहे. दीपिकाला अॅक्शन अवतारात पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. ‘सिंघम अगेन’मध्येही दीपिकाचे खतरनाक स्टंट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

एवढंच नाही तर दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स आता फक्त चित्रपटच नाही तर वेब सीरिजच्या माध्यमांतून देखील पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी सध्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सिरीजवर काम करत असून ती अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या वेब सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी हे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या